Rahul Vaidya लवकरच  Nach Baliye ऐवजी Khatron Ke Khiladi 11 मध्ये झळकण्याची शक्यता
Rahul Vaidya (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 14 फेम राहुल वैद्य (Rahul Vaidya) याची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सोशल मीडीयात राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड नेहा परमार या जोडीचे अपडेट्स असोत किंवा अगदी राहुल वैद्यची हटके फॅशन स्टेटमेंटस असो सध्या नेटकर्‍यांच्या चर्चेमध्ये राहुल असतोच. बिग बॉसच्या घरातून पुन्हा तरूणांच्या गळ्यातला ताईत झालेला राहुल आता करिअर पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान आता त्याच्याकडे अनेक रिअ‍ॅलिटी शोज येत असल्याची चर्चा आहे. यामधील दोन नावं म्हणजे नच बलिए (Nach Baliye ) आणि खतरो के खिलाडी 11 (Khatron Ke Khiladi 11). पण राहुलने डान्स रिएलिटी शो ऐवजी अ‍ॅडव्हेंचर निवडल्याची चर्चा आहे. नक्की वाचा: Rahul Vaidya-Disha Parmar यांचे झाले लग्न? जाणून घ्या नवविवाहित जोडप्याच्या वेषातील व्हायरल फोटोमागचे सत्य.

टाईम्स ऑफ इंडियाच्य रिपोर्ट्सनुसार, राहुल वैद्यने कलर्स टीव्हीच्या खतरों के खिलाडीच्या अगामी शो ची निवड केली आहे. खतरों के खिलाडीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस संपल्यानंतर काही आठवड्यात त्यांनी राहुलशी संपर्क साधला होता. दरम्यान त्याच्या पाठीला इजा झाली होती. अशावेळी स्टंट करणं कितपत शक्य आहे? याची तो चाचपणी करून निर्णय मागे पुढे होत होता. अजूनही यंदाच्या खतरों के खिलाडीच्या अंतिम स्पर्धकांमध्ये कोणाकोणाचा समावेश असू शकतो तावर चर्चा सुरू आहे. स्पर्धकांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.

राहुलच्या चाहत्यांना त्याला देशातील सर्वात कठीण आणि उत्सुकतावर्धक अशा रिलॅलिटी शो मध्ये पहायला मिळणं ही खूपच चांगली बातमी आहे. दरम्यान राहुल सोबतच अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी आणि नागिण फेम अर्जुन बिजलानी देखील दिसू शकतो.

राहुल वैद्य हा इंडियन आयडॉल 1 या लोकप्रिय शोचा रनअर अप होता. त्यानंतर तो अनेक रिअ‍ॅलिटी शो मध्ये दिसला होता. राहुल वैद्य हा प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडे गाण्याचे शिक्षण देखील घेत होता. आता गाण्यासोबतच इतर रिअ‍ॅलिटी शो मधील त्याचा समावेश त्याला करियरला कसे ट्विस्ट आणि टर्न देणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.