Bigg Boss 14 फेम Nikki Tamboli चा भाऊ Jatin Tamboli चे  COVID-19 मुळे निधन; अभिनेत्रीने शेअर केली भावूक पोस्ट
Nikki Tamboli With Brother (PC - Instagram)

भारतामध्ये कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा स्थिती चिंताजनक आहे. अनेकांनी यामध्ये आपले जीवलग गमावले आहेत. बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli)  हीने देखील तिच्या भावाला गमावले आहे. निक्कीचा भाऊ जतिन तांबोळी (Jatin Tamboli) कोविड 19 (COVID 19)  मुळे हे जग सोडून गेला आहे. निक्कीने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती देताना भावूक पोस्ट देखील लिहली आहे. काही दिवसांपूर्वीच निक्कीने कोविड 19 शी सामना करणार्‍या तिच्या भावाच्या तब्येतीमध्ये सुधार व्हावा म्हणून एक पूजा केल्याचे फोटो देखील शेअर केले होते.

निक्कीने इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहताना असं म्हटलं आहे की, 'आम्हांला माहित नव्हतं या सकाळी देव तुझं घेईल. आम्ही तुझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये तुला प्रेम दिलं आहे आणि आता तुझ्या मृत्यूनंतरदेखील तेच करत आहोत. तुला गमावल्यानंतर आम्ही दु:खात आहोत. तू एकटा नाही गेलास तुझ्यासोबत आमच्यातला एक हिस्सा घेऊन गेला आहे. या जगात आला होतास तेव्हा खूप आनंद घेऊन आला होतास. आता आम्ही तुला बघू शकत नाही पण तू कायम आमच्या सोबत आहेस. आता आपलं वर्तुळ तुटलं आहे पण देव एकापाठोपाठ एक सार्‍यांनाच बोलावतो आणि हे वर्तुळ पुन्हा जोडलं जाणार आहे. नक्की वाचा:  Nikki Tamboli Covid-19 Positive: ‘बिग बॉस 14’ फेम निक्की तंबोली ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; सोशल मीडियावर दिली माहिती.

निक्कीची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्कीचा भाऊ जतिन अनेक आजारपणांशी झुंजत होता. निक्कीने त्याची माहिती देताना जतिनच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले होते. जतिन अवघ्या 29 वर्षांचा होता. 20 दिवसांपेक्षा जास्त त्याच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.

Birthday Pawri या शेवटच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये निक्की दिसली होती. बिग बॉस 14 च्या टॉप 3 मध्ये निक्की होती. Rubina Dilaik या शोची विजेती ठरली तर राहुल वैद्य रनर अप होता.