Nikki Tamboli Covid-19 Positive: बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) शिकार झाली आहे. अभिनेत्रीने यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती दिली आहे. कोविडचा अहवाल सकारात्मक झाल्यावर तिने घरी स्वत: ला अलग केलं आहे, असेही अभिनेत्रीने सांगितले आहे.
निक्की तांबोळी ने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आज सकाळी मला कळले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत: ला अलग ठेवलेले आहे आणि आवश्यक त्या सर्व नियमांचे मी पालन करीत आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व औषधे मी घेत आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्व लोकांनी त्यांची कोविड चाचणी घ्यावी. तुमच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मी नेहमीचं आभारी आहे. कृपया स्वत: ची काळजी घ्या, मास्क घाला, आपले हात स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा." (वाचा - Mumbai Saga Full Movie HD Free Download साठी TamilRockers आणि Torrent वर Leak; John Abraham स्टारर चित्रपटाचे निर्माता झाले अस्वस्थ)
निक्कीच्या या पोस्टवर भाष्य करताना तिचे चाहते तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. अभिनव शुक्ला, मनु पंजाबी, शार्दुल पंडित आणि जॅस्मिन भसीन यांनी निक्कीच्या पोस्ट गेट वेल सून अशी प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
निक्की तांबोळी कलर्सचा सर्वात प्रसिद्ध रिअलिटी शो बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. जेव्हा तो शोमध्ये तिची एन्ट्री झाली तेव्हा ती लोकांना फारशी माहिती नव्हती. मात्र, शो संपल्यापासून प्रत्येकजण निक्कीला ओळखू लागला. निक्की या शोची विजेती निक्की होऊ शकली नाही, परंतु तिने अव्वल 3 मध्ये स्थान मिळवले.