Neeti Mohan Blessed With Baby Boy: गायिका नीति मोहन हिने दिला गोंडस मुलाला जन्म, पती Nihaar Pandya ने सोशल मिडियाद्वारे दिली ही गोड बातमी
Neeti Mohan-Nihaar Pandya Blessed With Baby Boy (Photo Credits: Instagram)

सुप्रसिद्ध गायिका नीति मोहन (Neeti Mohan) आणि पती निहार पांड्या (Nihaar Pandya)  माता पिता झाले असून नीतिने आज गोंडस मुलाला जन्म (Baby Boy) दिला आहे. निहारने सोशल मिडियाद्वारे आपण पिता झाल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही गोड बातमी ऐकल्यानंतर अनेक कलाकारांसह चाहते या दोघांचे अभिनंदन करत आहे. नीति गरोदर राहिल्यानंतर तिचे डोहाळं जेवण आणि फोटोशूट प्रचंड चर्चेत होते. त्यानंतर आज ही बातमी देऊन त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. निहारने आई आणि बाळ दोघेही ठिक असल्याचे पोस्टद्वारे सांगितले आहे.

निहारने सोशल मिडियावर नीति आणि आपला फोटो शेअर करुन आपण माता पिता झाल्याचे सांगितले आहे. "माझी सुंदर पत्नी माझ्या छोट्या मुलाला ते सर्वकाही शिकवण्याची संधी देत आहे जे माझ्या वडिलांनी मला शिकवले. ती माझ्या जीवनात दिवसेंदिवस प्रेम पसरवत चालली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीति आणि आमचे चिमुकले बाळ दोघेही स्वस्थ आणि ठिक आहेत."हेदेखील वाचा- Kapil Sharma अखेर आपल्या मुलाचे नाव केले जाहीर, Neeti Mohan च्या प्रश्नाला उत्तर देत नावावारून उठवला पडदा

 

View this post on Instagram

 

A post shared by Nihaar Pandya (@nihaarpandya)

गायिका नीतिने फेब्रुवारी महिन्यात आपण आई होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. नीतिने सोशल मिडियावर बेबी बंपसह फोटो शेअर करत ही बातमी दिली होती. या फोटोमध्ये निहार नीतिच्या बेबी बंपला किस करुन आम्ही लवकरच दोनाचे तीन होणार आहोत असे सांगितले होते.

नीति मोहन ही शक्ती आणि मुक्ती मोहन यांची बहिण आहे. या दोघीही आपापल्या क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय आहेत.