Naagin 5 Promo: हिना खान ची भूमिका असलेल्या 'नागिन 5' मालिकेचा प्रोमो प्रदर्शित; पहा व्हिडिओ
Naagin 5 Promo Hina Khan (Photo Credit - Instagram)

Naagin 5 Promo: एकता कपूरचा पॉपुलर शो 'नागिन 5' (Naagin 5) ची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत आहेत. 'नागिन 5' च्या निर्मात्यांनी या शोचा प्रोमो रिलीज केला आहे. हा प्रोमो अतिशय इंट्रेस्टिंग आणि आकर्षक आहे. या शोमध्ये हिना खान (Hina Khan) इच्छाधारी नागीन बनली आहे. तसेच मोहित मल्होत्रा (Mohit Malhotra) ने यात नागाची भूमिका बजावली आहे. याशिवय धीरज धुपर (Dheeraj Dhoopar) विलेनच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नागिन 5 च्या प्रोमोमध्ये मोहित आणि हिना एकमेकांच्या प्रेमात दंग झाले असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशात धीरज धुपर त्यांच्या प्रेमाला ग्रहण लावत विलेनची भूमिका पार पाडताना दिसत आहे. धीरज धुपर नागिनला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 'सत्ययुगापासून कलयुगापर्यंत आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी आली आहे नागिन,' असं या प्रोमोच्या बॅकग्राउंडमध्ये सांगण्यात आलं आहे. (हेही वाचा - सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कॅलिफोर्नियात दिसले अभिनेत्याला न्याय देणारे पोस्टर, परिवाराने सुरु केली ##warriors4ssr चळवळ)

दरम्यान, कलर्स टीव्हीने हा प्रोमो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 'नागिन5' मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. नागिन मालिका ही एकता कपूरचा सर्वांत मोठा शो आहे. दरम्यान, 'नागिन 4' शो 8 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे 9 ऑगस्टपासून म्हणजेचं शनिवार आणि रविवार रात्री 8 वाजता हिना खान आपली संघर्षमय प्रेम कहाणी घेऊन कलर्स टीव्हीवर येत आहे.