सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कॅलिफोर्नियात दिसले अभिनेत्याला न्याय देणारे पोस्टर, परिवाराने सुरु केली ##warriors4ssr चळवळ
सुशांतचे बिलबोर्ड झळकले कॅलिफोर्नियात (Photo Credits-Twitter)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. परंतु आता सीबीआयसह ईडी कडून सुद्धा या प्रकरणी समील असलेल्या व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे. याच दरम्यान आता सोशल मीडियात सुशांतसाठी #worldforsushant असे कॅम्पेन सुरु करण्यात आले असून त्याला लाखोंच्या संख्येने प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. याच दरम्यान आता सुशांत सिंह राजपूत संदर्भातील चालवल्या जाणाऱ्या या कॅम्पेनचे एक बिलबोर्ड कॅलिफोर्नियात सुद्धा दिसून आले आहे. याबाबत सुशांत याची बहिण श्वेता सिंग किर्ती हिने ट्वीट केले आहे.

श्वेता सिंह किर्ती हिने ट्वीट करत एक फोटो सुद्धा झळकवला आहे. त्यात सुशांतचे एक मोठे बिलबोर्ड दिसून येत असून त्यावर #Justice For Sushant Singh Rajput असे लिहिण्यात आले आहे. या फोटोसह श्वेता हिने असे म्हटले आहे की, हे बिलबोर्ड कॅलिफोर्नियातील असून एका मॉलबाहेर असणाऱ्या पार्किंग परिसरातील आहे. सुशांतसाठी जगभरात ही चळवळ सुरु आहे. त्याचसोबत #warriors4ssr #justiceforsushantsinghrajput #worldforsushant असे टॅग सुद्धा तिने आपल्या ट्वीट मध्ये वापरले आहेत.(Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीचे Call Details झाले उघड; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर बांद्रा DCP Abhishek Trimukhe यांच्याशी झाले अनेकवेळा बोलणे)

श्वेता सिंह किर्ती हिच्यानंतर अंकिता लोखंडे हिने सुद्धा यामध्ये आपला सहभाग दर्शवला आहे. यामध्ये तिने सुशांतच्या आईचा फोटो झळकावला असून असे लिहिले आहे की, आम्हाला विश्वास आहे तुम्ही दोघे आमच्या सोबत आहात. त्याचसोबत पीएमओ यांनी सुद्धा या प्रकरणी दखल घेण्याचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अपील केले आहे.