Mohit Malik Tests Positive for Coronavirus: 'कुल्फी कुमार बाजेवाला' फेम मोहित मलिक कोरोना पॉझिटिव्ह; पत्नी अदिती हिचीही केली टेस्ट
Mohit Malik (Photo Credit: Instagram)

चीनमध्ये जन्मलेले कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. दरम्यान, कोरोनाच्या जाळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटींसह टीव्ही मालिकेतील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याचदरम्यान, लोकप्रिय मालिका 'कुल्फी कुमार बाजेवाला' (Kullfi Kumarr Bajewala) फेम मोहित मलिक (Mohit Malik) यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याची पत्नी आदिती (Addite Shirwaikar Malik) ही गर्भवती असून तिचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, तिची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मोहितने इन्स्टाग्राम अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

नुकतीच मलिकने इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने लिहले की, मला शुक्रवारी थोडा ताप आला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मी कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने माझी पत्नी अदिती मलिक हिची कोरोना चाचणी करण्यात आली असून तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना क्वारंटाइन केले आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी इंस्टाग्राम पोस्ट त्याने केली आहे. हे देखील वाचा- बिग बॉस 14 ची टॅलेंट मॅनेजर Pista Dhakad हिचा मृत्यू; Weekend Ka Vaar शूटनंतर सेटबाहेरच अपघात

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Malik (@mohitmalik1113)

याआधी टीव्ही मालिकेतील स्टार पार्थ समथान, शरद मल्होत्रा, सारा खान, सतीश शाह, हिमानी शिवपुरी, राजेश्वरी सचदेव आणि पूरब कोहली यांसह अनेक कलाकरांना कोरोनाच्या जाळ्यात अडकले होते.