बिग बॉस 14 ची टॅलेंट मॅनेजर Pista Dhakad हिचा मृत्यू; Weekend Ka Vaar शूटनंतर सेटबाहेरच अपघात
Bigg Boss (Photo Credits: Twitter)

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) च्या सेटवरुन अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. सेटबाहेरच बिग बॉसच्या दोन एम्पॉईजचा अपघात झाला. या अपघातात Pista Dhakad हिचा मृत्यू झाला आहे. Pista ही Endemol Shine India या प्रॉडक्शन कंपनीत टॅलेंट मॅनेजर (Talent Manager) म्हणून कार्यरत होती. काल (15 जानेवारी, शुक्रवार) बिग बॉसची टीम सलमान खान (Salman Khan) सोबत 'विकेंड का वार' (Weekend ka Vaar) चे शूटिंग करत होती. फ्लिम सिटीमध्ये (Film City) असलेल्या सेटवर त्यांचे शूटिंग सुरु होते. हे शूटिंग संपल्यानंतर झालेल्या अपघातात Pista चा मृत्यू झाला आहे.

शूटिंग संपल्यानंतर PIsta आपल्या एका असिस्टंट सोबत अॅक्टीव्हावरुन निघाली. अंधारात नीटसे न दिसल्याने रस्त्यावरील खड्ड्यात अॅक्टीव्हा स्लिप झाली आणि दोघेही गाडीवरुन खाली पडले. एकजण गाडीच्या उजव्या बाजूला पडला तर Pista डाव्या बाजूला पडली. मागून येणाऱ्या व्हॅनिटी व्हॅनने न कळत तिला उडवले. या अपघातात अवघ्या 24 वर्षीय Pista ला आपले प्राण गमवावे लागले.

एका प्रसिद्ध प्रॉडक्शन कंपनीत काम करण्यासोबतच तिने 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' यांसारख्या रियालिटी शो साठीही काम केले होते. त्याचबरोबर तिचे अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे तिच्या अकाली मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, बिग बॉस हा अत्यंत लोकप्रिय शो आहे. यात सलमान खान ला पाहण्यासाठी 'विकेंड का वार' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु, या शूटिंगनंतर ही दु:खद घटना समोर आली आहे.