Adarsh Shinde (Photo Credits: Instagram)

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका लवकरच स्टार प्रवाहवरुन रसिकांच्या भेटीला येत आहे. पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh) या मालिकेत बाबासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. बाबासाहेबांच्या लूकमधील सागर याची पहिली झलक समोर आल्यानंतर आता मालिकेचं शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या संकल्पनेतून हे गीत साकारलं आहे. (सागर देशमुख साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका; पहा पहिली झलक)

आदर्श आणि उत्कर्ष यांच्या लेखणीतून अवतरलेले गीत या दोघांनीच संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शच्या दमदार आवाजात आपल्याला मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. या गीताची खास झलक आदर्शने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

पहा शीर्षकगीताची खास झलक:

 

View this post on Instagram

 

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' या मालिकेचे ‘भीमराया’हे शीर्षक गीत सगळ्यांसमोर आणताना आज विशेष आनंद होतोय. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या त्यांच्या जीवनावरील भव्य कलाकृतीचा आम्हाला भाग होता आलं याचा अभिमान वाटतो. “भीमराया” गीतकार: डाॅ. उत्कर्ष शिंदे- आदर्श शिंदे. संगितकार: डाॅ. उत्कर्ष शिंदे- आदर्श शिंदे. संगीत संयोजक:उत्कर्ष-आदर्श. गायक: आदर्श शिंदे. Recorded Mixed and Mastered by #Ajivasanstudios अवधूत वाडकर, मंदार वाडकर #शिंदेशाही #adarshshindetittlesong #adarshshindesong #adarshshindebabasahebsong #DrBabasahebAmbedkar #BabasahebOnStarPravah #StarPravah Legends live through stories. Sneak peek into the making of #Bhimraya. Title song created by #AdarshShinde #UtkarshShinde #shindeshahi. Proud and honoured to be a part of the show portraying life and legacy of “Dr.Baba Saheb Ambedkar”. #Staytuned to Star Pravah for the Show premier on 18th May 2019. “Dr. Babasaheb Ambedkar”Mahaamaanavaachi Gauravgaathaa. Title track: Bheemraya Lyrics: Dr. Utkarsh Shinde- Adarsh Shinde Music: Utkarsh-Adarsh Singer: Adarsh Shinde Music Arrangement and Programming:Utkarsh-Adarsh Recorded Mixed And Mastered by Avdhoot Wadkar & Mandar Wadkar #ShindeShahi #HouseofMusic

A post shared by Adarsh Shinde (@adarshshinde) on

18 मे बौद्ध पौर्णिमेपासून महामानवाचा जीवनप्रवास छोट्या पडद्यावर उलघडणार आहे.