महाराष्ट्राचं कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व पुलं देशपांडे (P L Deshpande) रूपेरी पडद्यावर साकारणारा सागर देशमुख (Sagar Deshmukh) आता लवकरच डॉ. बाबासाहेब देशपांडे (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह चॅनेलवर एका मालिकेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला रसिकांसमोर ठेवण्यात येणार आहे. दिग्दर्शक अजय मयेकर(Ajay Mayekar) या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपातील सागर देशमुखची पहिली झलक रसिकांसमोर आली आहे. यापूर्वी 'वाय झेड', 'पुल देशपांडे पुर्वाध', 'पु लं देशपांडे उत्तरार्ध' या सिनेमातून सागर रसिकांच्या भेटीला आला होता. आता पहिल्यांदा तो टेलिव्हिजनच्या माध्यमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच स्वप्नील जोशी-अमृता खानविलकर 'जिवलगा' मालिकेतून पुन्हा एकत्र येणार आहेत.
आंबेडकरांच्या रूपात सागर देशमुख
‘स्टार प्रवाह’ घेऊन येतंय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’… महामानवाची गौरव गाथा
अभिनेता सागर देशमुख साकारणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका#SagarDeshmukh @TeamDashami @nitinpvaidya @ninad_nv pic.twitter.com/ZCmgDL9oq6
— Star Pravah (@StarPravah) March 28, 2019
मालिकेसाठी सागर देशमुखचा मेक डिझाईन विशाल पाठारे यांनी केला आहे. मेकअपच्या माध्यमातून सागर आणि बाबासाहेबांचा लूक मॅच करण्यात आला आहे. मात्र त्यासोबतच सागर आणि बाबासाहेब यांच्यांमधील साधर्म्य म्हणजे दोन्ही कायद्याचे विद्यार्थी आहे. सिनेक्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी सागर विविध नाटकांमध्येही काम करत असला तरीही तो पेशाने वकील आहे. मुंबई आणि पुण्यात तो कायद्याची प्रॅक्टीक्स करत होता.
चित्रपटांसोबत मराठी मालिकांमध्येही आता बायोपिक साकारली जात आहेत. सध्या 'बाळूमामाच्या नावाने चांगभलं' आणि 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका सुरू आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि खंडोबाच्या जीवनावर आधारित मालिका सुपरहिट ठरल्या आहेत.