Malvi Malhotra Stabbing Case: अभिनेत्री मालवी मल्होत्रा वर हल्ला करणारा फरार योगेश सिंह ला शोधण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश, हॉस्पिटल मध्ये दाखल असल्याने अटक नाही
(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांनी अभिनेत्री मालवी मल्होत्रा (Malvi Malhotra) वर हल्ला करून पळून जाणार्‍या आरोपीला शोधलं आहे. पण अद्याप त्याला अटक केलेली नाही. दरम्यान पोलिसांनी आज (28 ऑक्टोबर) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेस महिपाल सिंग (Yogesh Mahipal Singh) हा रूग्णालयात दाखल आहे. वसई (Vasai) मध्ये एक हॉस्पिटल मध्ये योगेस असल्याची माहिती काल रात्री मुंबई पोलिसांना मिळाली. Actress Malvi Malhotra Attacked by Goons: लग्नास नकार दिल्याने अभिनेत्री मालवी मल्होत्रा वर धारदार चाकूने केला जीवघेणा हल्ला, धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल.

दरम्यान अभिनेत्री मालवी मल्होत्रा हीने योगेस सिंह वर तिच्यावर हल्ला केल्याचे आरोप लावले आहेत. पोटाजवळ आणि हातांवर धारदार अस्त्राने हल्ला केल्याची माहिती मालवीने वर्सोवा पोलिस स्थानकात दिली आहे. मालवीने योगेशसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव नाकारल्याने हा हल्ला झाल्याची माहिती तिने दिली आहे. तर मालवीवर हल्ला करून आरोपी कार घेऊन पळाला. तर मालवीवर मुंबईत एका खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

वर्सोवा पोलिसांच्या 2 टीम सध्या काम करत आहेत. आज पुन्हा या केसबद्दल अपडेट घेण्यासाठी पोलिस जाणार आहेत. काल आरोपीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याने अटक करता आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरा आरोपीवर कलम 307 (attempt to murder)सोबतच अन्य कलमांर्गत वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

आरोपी योगेश आणि अभिनेत्री मालवी यांची वर्षभराची ओळख आहे. योगेशला तिच्यासोबत लग्न करायचं होतं तसा त्याने प्रस्ताव देखील ठेवला होता. मात्र मालवीने नकार देताच तिच्यावर हल्ला झाला आहे.