हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून समोर आलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रा (Malvi Malhotra) हिच्यावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 29 वर्षीय अभिनेत्रीवर एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचे मिडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. लग्न करण्यास नकार दिल्याने तिच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मालवीला कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
TV9 मराठी दिलेल्या वृत्तानुसार, मालवीने लग्नाची मागणी धुडकावल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वर्सोवा पोलिस स्टेशनात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. Hindustani Bhau's Mother Passes Away: हिंदुस्तानी भाऊ ला मातृशोक, कुटूंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मालवीची प्रकृती स्थिर असून तिच्यावरील धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आरोपीने मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केल्याची माहिती आहे.
मालवीने तेलुगू आणि मलयालम चित्रपटांत काम केले आहे. तसेच कलर्सवरील कार्यक्रम 'उड़ान' मध्येही तिने काम केले आहे. सोशल मिडियावर मालवी बरीच सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर देखील अनेक फॉलोअर्स आहेत.