Hindustani Bhau's Mother Passes Away: हिंदुस्तानी भाऊ ला मातृशोक, कुटूंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Hindustani Bhau (Photo Credits: Facebook)

सोशल मिडियाच्या माध्यमातून तरूणांमध्ये लोकप्रिय झालेला हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) ऊर्फ विकास फाटक (Vikas Fhatak) यांच्या आईबाबत एक दु:खद बातमी समोर येत आहे. हिंदुस्तानी भाऊच्या आईंचे निधन झाले आहे. मातृशोकाने हिंदुस्तानी भाऊ यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉस 13 चे स्पर्धक (Bigg Boss 13 Contestant) देखील होते. हिंदुस्तानी भाऊ आणि त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिंदुस्तानी भाऊ आपल्या आईच्या खूप जवळ होते. त्यामुळे त्यांचे निधनाने खूपच दु:खी झाले आहेत.

दरम्यान आजच हिंदुस्तानी भाऊ आणि एकता कपूर प्रकरणाची कोर्टाची तारीख होती. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर राहायचे होते. मात्र आई जाण्याचे दु:ख ते सहन करु शकत नाहीय. त्यामुळे ते आज कोर्टात हजर राहू शकणार नाही असे त्यांचे वकिल अली काशिफ खान यांनी सांगितले आहे.

हेदेखील वाचा- XXX Uncensored Season 2 Controversy: हिंदुस्तानी भाऊ ने एकता कपूर ला पद्मश्री पुरस्कार परत देण्याची केली मागणी, निर्माती ला म्हणाला - एक थी कबूतर, एकट्यातच ऐका हा व्हिडिओ (Ear Phones Recommeded)

हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या घरात स्पर्धक असताना वा आपल्या मुलाखतीत नहेमी आपल्या आईचा उल्लेख करायचे. आईसोबत ती खूप जास्त जोडले गेलेले होते. यावरून त्यांचे मातृत्व प्रेम आणि त्यांच्या विषयी असलेला आदर नेहमी दिसून यायचा.

दरम्यान हिंदुस्तानी भाऊ ने काही महिन्यांपूर्वी एकता कपूर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. त्यांचा असा आरोप होता की एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये भारतीय सैन्याचा अपमान करण्यात आला होता.