Hindustani Bhau and Ekta Kapoor (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 13 चे स्पर्धक हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) ने प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) वर असा आरोप लावला होता की त्यांनी आपल्या नवीन वेबसीरीज XXX Uncensored Season 2 ने भारतीय सैन्यावर अपमान करत चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहे. यामुळे हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठक (Vikas Pathak) ने मुंबईच्या खार पोलीस स्टेशनात FIR केली होती. एकता कपूर आणि त्यांच्या आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध सक्त कारवाईची मागणी केली होती. यावर वर भाऊ आज आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करुन एकता कपूरला 'एक थी कबूतर' असे संबोधले आहे.

तसेच या व्हिडिओमध्ये एकता कपूरला पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओमध्ये एकताची तक्रार केल्यानंतर अनेक मोठ्या लोकांचे त्याला फोन आले असे हिंदुस्तानी भाऊ म्हणाला आहे. तसेच यात अनेक अपशब्दांचा देखील वापर केला आहे. XXX Uncensored Season 2: हिंदुस्तानी भाऊ ने एकता कपूर वर 'हा' मोठा आरोप लावत खार पोलिसांकडे नोंदवली तक्रार (Watch Video)

 ईअरफोन लावून हा व्हिडिओ ऐका

जोपर्यंत एकता कपूर आणि त्यांची आई शोभा कपूर भारतीय सैन्याची माफी मागत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी शांत होऊ देणार नाही असे हिंदुस्तानी भाऊ ने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

एकता च्या XXX Uncensored Season 2 सिरीज मध्ये एका सेक्स सीन मध्ये एका पात्राला भारतीय सैन्याचा युनिफॉर्म घालायला लावला आहे, त्या युनिफॉर्म मध्ये तो व्यक्ती रोमान्स करताना दाखवण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत हिंदुस्थानी भाऊने सीरिजच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यावर टीका केली आहे.