XXX Uncensored Season 2: हिंदुस्तानी भाऊ ने एकता कपूर वर 'हा' मोठा आरोप लावत खार पोलिसांकडे नोंदवली तक्रार (Watch Video)
Hindustani Bhau & Ekta Kapoor (Photo Credits: Facebook)

बिग बॉस 13 (Bigg Boss 13) आणि युट्युब व्हिडीओ मधून घराघरात पोहचलेल्या हिंदुस्थानी भाऊची (Hindustani Bhau) म्हणजेच विकास पाठक (Vikas Pathak) यांची सोशल मीडियावर नेहमीच कमाल चर्चा असते. मध्यंतरी कॅरीमिनाटी विरुद्ध आमिर सिद्दीकी (Carryminati vs Amir Siddiqui) असा युट्युब विरुद्ध टिक टॉक (Youtube vs TikTok) असा वाद सुरु असताना विकास यांचा व्हिडीओ बराच चर्चेत होता. आता पुन्हा एकदा हिंदुस्थानी भाऊंचे नाव एका वेगळ्या गोष्टीमुळे समोर आले आहे. खरंतर रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विकास यांनी आता प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिला निशाणा केले आहे. एकता कपूर (Ekta Kapoor) हिच्या XXX Uncensored Season 2 या सिरीज मधून भारतीय सैन्याचा अपमान केला गेल्याचा आरोप लगावत विकास यांनी खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस स्टेशन मध्ये जाण्याआधी विकास यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून आपण एका सेलिब्रिटींच्या विरुद्ध टाकणार करण्यासाठी जात आहोत असे सांगितले होते.

हिंदुस्तानी भाऊ ने खार पोलिसांकडे एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. एकता च्या XXX Uncensored Season 2 सिरीज मध्ये एका सेक्स सीन मध्ये एका पात्राला भारतीय सैन्याचा युनिफॉर्म घालायला लावला आहे, त्या युनिफॉर्म मध्ये तो व्यक्ती रोमान्स करताना दाखवण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत हिंदुस्थानी भाऊने सीरिजच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यावर टीका केली आहे. XXX Uncensored Season 2 New Trailer: आकाश चौधरी आणि गरिमा जैन यांच्या हॉट Sex, Lust आणि Dhokha थीम वरील वेबसिरीजचा नवा ट्रेलर झाला लाँच (Watch Video)

हिंदुस्तानी भाऊ व्हिडीओ

दरम्यान या तक्रारारीवरून अद्याप पुढे काही कारवाई तरी झालेली नाही, किंबहुना एकता कपूर तर्फे सुद्धा यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र हा सुरु झालेला वाढ आता पुढे काय रूप घेतो हे पाहणी उत्सुकतेचे ठरणार आहे.