Krushna Abhishek आणि त्याचा मामा Govinda च्या नात्यात आला दुरावा, विनोदी कलाकाराने घेतला 'हा' मोठा निर्णय
Govinda And Krushna Abhishek (Photo Credits: Instagram)

विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) हा सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) चा भाचा आहे हे सर्वांना माहित आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करतेवेळी अनेकदा ही गोष्ट समोर येत गेली. मात्र कालांतराने मामा-भाच्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. याचे अंदाज कृष्णा अभिषेक गोविंदाच्या समोर जाणे टाळत असल्याच्या गोष्टीवरुन सिद्ध झाले आहे. लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा' मध्ये सपना हे पात्र साकारणारा कृष्णाने अलीकडेच या शो एक एपिसोड करण्यास नकार दिला आहे. त्याला कारण त्याचा मामा त्या एपिसोडमध्ये सहभागी होणार आहे. हे पहिल्यांदा घडत नाहीय. याआधी त्याची मामी म्हणजेच गोविंदाची बायको सुनीता (Sunita) जेव्हा आपल्या मुलीसह टीना अहुजासह (Teena Ahuja) या शोमध्ये आली होती तेव्हा देखील कृष्णा स्टेजवर आला नव्हता. त्याचे कारण सुनीता कृष्णासह शूट करण्यास तयार नव्हती.

सुरुवातीच्या काळात मामा आणि भाचा अनेकदा स्टेजवर एकत्र थिरकताना दिसत होते. त्यावेळी लोकांनी कृष्णाचा अभिनय आणि डान्स पाहून तो गोविंदाचा भाचा शोभतो असे सर्वजण म्हणायचे. मात्र त्यानंतर कुठे माशी शिंकली माहित नाही. ते आपोआपच बोलायचे बंद झाले आणि त्यांच्यात दुरावा आलेला अनेकदा पाहायला मिळाला. या दरम्यान कृष्णाने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, 'मला 10 दिवसापूर्वी मामा आपल्या शो मध्ये येणार असल्याचे कळाले. मात्र त्यांच्या सोबत सुनीता मामी नव्हती त्यामुळे मी ठरवलेले की हा एपिसोड करायचा. मात्र आपल्यासोबत जे काही याआधी झाले त्यामुळे आमच्या नात्यात दुरावा आला आहे. याआधी मामी माझ्यासोबत काम करु इच्छित नव्हती. मात्र आता माझे काही स्वत:चे निर्णय आहेत.' असे म्हणाला आहे.हेदेखील वाचा- Kashmira Shah Superhot Bikini Photoshoot: हॉट अभिनेत्री कश्मीरा शाह हिचे बिकिनीतील बोल्ड फोटोज पाहून चाहत्यांना फुटेल घाम, See Pics

 

View this post on Instagram

 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

कृष्णा पुढे असेही म्हणाला की, 'मामासोबत माझे खूपच घट्ट नाते होते. त्यामुळे या दुराव्याने मला खूप मानसिक त्रास झाला आहे. जेव्हा दोन लोकांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो तेव्हा विनोदी सीन्स करणे थोडे अवघड होते. असंही होऊ शकतं की मामा माझ्या जोक्सवर नाराज होतील. चांगल्या कॉमेडीसाठी सेटवर चांगले वातावरण हवे असते.'

असे सांगण्यात येते की, 2018 मध्ये कृष्णाची पत्नी कश्मिरा शाह ने एका ट्विटमध्ये असे म्हटले होते की, "काही लोक केवळ पैशासाठी नाचतात." यावर कृष्णाचे मामा-मामी नाराज झाले होते आणि तेव्हापासून हा वाद सुरु झाला होता.