Kashmira Shah Superhot Bikini Photoshoot: हॉट अभिनेत्री कश्मीरा शाह हिचे बिकिनीतील बोल्ड फोटोज पाहून चाहत्यांना फुटेल घाम, See Pics
Kashmira Shah Bold PhotoShoot (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmira Shah) हिने सरोगसी द्वारे जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर काही काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिली. दरम्यान रिअॅलिटी शोमधून अधून मधून ती आपल्या नजरेस पडत असे. मात्र तिचा हॉट अंदाज तिचे चाहते प्रचंड मिस करत होते. दरम्यानच्या काळात तिचे वजन देखील वाढले होते. त्यामुळे तिने आपल्यातच बदल करायचा ठरवून स्वत: चा कायापालट केला आहे. तिने आपले 10 किलो वजन (Transformation) कमी करुन नुकतेच एक बिकिनी फोटोशूट केले आहे. हे फोटो पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाला असून तिचे हे दमदार कमबॅक पाहून आनंदून गेले आहेत.

कश्मिराचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोकही थक्क झाले आहेत. या फोटोशूटमध्ये कश्मिरा स्विमिंगपूल जवळ बसून बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहे.

कश्मिरा हिचे गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक याच्याशी 2003 साली लग्न झाले.

हेदेखील वाचा- बॉलिवूड कलाकारांच्या संदर्भात Defamatory Content दाखवू नये, दिल्ली हायकोर्टाचे News Channels ला आदेश

हे फोटो कश्मिराने आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले असून 'आय़ुष्यात बदल गरजेचा आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून करा.' असे कॅप्शन लिहिले आहे. कश्मिराने निळ्या रंगाची बिकिनी घातली असून यात तिने एकाहून एक हॉट आणि सेक्सी अंदाज दाखवताना दिसत आहे.