Khatron Ke Khiladi 11: लवकरच येणार स्टंट शो 'खतरों के खिलाड़ी’ चा 11वा सिझन; शुटींगसाठी केपटाऊनला रवाना झाले राहुल वैद्य, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी (See Photos)
Rahul Vaidya (PC- Instagram)

रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) सर्वाधिक लोकप्रिय स्टंट रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाड़ी’ चा 11वा (Khatron Ke Khiladi 11) सिझन येऊ घातला आहे. यासाठीचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. कोरोना महामारीमध्ये ‘खतरों के खिलाडी 11' या शोचा बिगुल वाजला आहे. गुरुवारी मध्यरात्री या शोचे 11 स्पर्धक शूटिंगसाठी केपटाऊनला रवाना झाले. खतरों के खिलाडी 11 मध्ये एक-दोन नव्हे तर बिग बॉस 14 चे तीन स्पर्धक दिसणार आहेत. याशिवाय टीव्हीचे अनेक लोकप्रिय कलाकार या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत.

शोमध्ये श्वेता तिवारी, अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी, राहुल वैद्य, वरुण सूद, सबा मकबूल, अर्जुन बिजलानी, विशाल आदित्य सिंग, सौरभ राज जैन, दिव्यांका त्रिपाठी असे कलाकार भाग घेणार आहे. राहुल वैद्यला विमानतळावर सोडण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार आली होती. बिग बॉस 14 मधून चर्चेत आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी हा शोमध्ये भाग घेणार असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला होता, कारण नुकताच कोरोनामुळे तिचा भाऊ वारला आहे. (हेही वाचा: Kaun Banega Crorepati 13: 'कौन बनेगा करोडपति'च्या 13 व्या सिझनची घोषणा; जाणून घ्या कधी व कुठे करू शकला रजिस्ट्रेशन)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Telly Tashan (@tellytashan)

 

दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’ हा अमेरिकन फियर फॅक्टरवर आधारित भारतीय स्टंट गेम शो आहे. सध्या याचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी करत आहे. मात्र याआधी प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार, अर्जुन कपूर यांनही हा शो होस्ट केला आहे. या शोमध्ये टीव्ही स्टार्स अनेक धोकादायक स्टंट करताना दिसतात. ज्यामध्ये बर्‍याच उंचावरील, पाण्यातील तसेच प्राण्यांसोबतच्या स्टंटचा समावेश असतो.