कपिल शर्मा याची पत्नी गिन्नी चतरथ पुन्हा एकदा होणार आई, नव्या चिमुकल्याचे लवकरच होणार आगमन
Kapil Sharma-Ginni Chatrath (Photo Credits-Instagram)

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याने सोशल मीडियात त्याची पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली आहे. खरंतर ट्विटरवर #AskKapil च्या सेशन वेळी एका चाहत्याने कपिलला एक प्रश्न विचारला होता. त्याने असे विचारले होते की, द कपिल शर्मा शो ऑफ एअर का आहे? या प्रश्नाला कपिलने उत्तर देत असे म्हटले की, मी घरी राहून माझ्या बायकोसह दुसऱ्या चिमुकल्याचे स्वागत करु शकेन.

कपिल शर्मा बाबा होणार असल्याच्या आनंदात त्याला आता सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वीच बोलले जात होते की, कपिलच्या घरी पुन्हा एकदा चिमुकल्याचे आगमन होईल. पण त्याची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नव्हती. मात्र कपिलने आता स्वत:हून याबद्दल जाहीर केले असून चाहतांना गोड बातमी दिली आहे.(The Kapil Sharma Show: जाणून घ्या नक्की का बंद होणार 'द कपिल शर्मा शो')

Tweet:

याआधी कपिल याला अनायरा नावाची मुलगी आहे. तिचा जन्म डिसेंबर 2019 मध्ये झाला होता. कपिल-गिन्नी या दोघांनी 12 डिसेंबर 2018 रोजी लग्न केले होते. दोघे एकमेकांना गेल्या काही वर्षांपासून डेट ही करत होते. तर कपिलच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तो कॉमेडी शो द कपिल शर्मा च्या दुसरा सीजन यशस्वी ठरला होता. पण तो आता फेब्रुवारी पासून ऑफ एअर होणार आहे. परंतु काही महिन्यानंतर नव्या कॉन्सेप्टसह तो पुन्हा एकदा सुरु होणार आहे. याच दरम्यान नेटफ्लिक्सवरील एका वेबसीरिज मधून ही आपला डिजिटल डेब्यू करणार आहे.