Kacha Badam Fame Anjali Arora On MMS: 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोडा हिला कथीत MMS लीक प्रकरणावर फुटले रडू, म्हणाली 'अब्रुशी खेळू नका'
Anjali Arora | (Photo Credits: Instagram)

Anjali Arora Opens Up on her Viral Leaked MMS: अंजली अरोडा. तुम्ही हे नाव ऐकले असण्याची शक्यता अधिक आहे. त्यात तुम्ही जर सोशल मीडिया फ्रेंडली असाल तर या नावाची प्रचितिही तुम्हाला आली असेल. अजूनही आठवत नसेल तर सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' (Kacha Badam) सर्च करा. होय, 'कच्चा बदाम' (Anjali Arora Kacha Badam) या व्हायरल झालेल्या एका गाण्यावर विशिष्ट पद्धतीने केलेला तिचा नाच चांगलाच चर्चेत आला होता. तिच्या या नाचाची म्हणजेच डान्सची सोशल मीडियावर इतकी चर्चा झाली की, जणू ती सेलिब्रेटीच बनली. अशी ही अंजली सध्या एका वेगळ्याच कारमामुळे चर्चेत आली आहे. इंटरनेटवर म्हणचे तिचा एक अश्लील एमएमएस व्हिडिओ व्हायरल (Anjali Arora Video) झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओ अथवा तत्सम एमएमएसची पुष्टी करत नाही. दावा केला जात आहे की, हा एमएमएस व्हिडिओ अंजली ओरोडा हिचाच आहे. प्रत्यक्षात अंजलीने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. हा व्हिडिओ कोणीतरी मॉर्फ केला आहे. दुसऱ्याच कोणत्यातरी चेहऱ्यावर माझा चेहरा लावल्याचे अंजली सांगते. खरे खोटे तिलाच माहिती. कोणी तपास केला तर कदाचित सत्य पुढे येईलही. सध्या मात्र सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु आहे.

अंजली अरोडा ही अलिकडेच 'लॉकअप' नावाच्या एका टीव्ही शोमध्ये दिसली होती. तिच्या चाहते आणि हितचिंतकासाठी तिचे टीव्ही शोमध्ये दिसने ही कौतुकाची बाब होती बहुदा. कारण तिच्या चाहत्यांनी तशा प्रतिक्रियाही त्या वेळी दिल्या होत्या. ते काहीही असो पण व्हायरल झालेल्या कथीत एमएमएसबद्दल जेव्हा दस्तुरखुद्द अंजली अरोडा हिलाच विचारले तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती म्हणते, तो कथीत व्हिडिओ माझा नाहीच. कोणीतरी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ मॉर्फ केला आहे. आता अंजलीने स्वत:च असे म्हटले आहे की, आपल्याला त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. नाहीतरी अशा प्रकारचे व्हिडिओ कोण बनवेल आणि सोशल मीडियावर कशाला टाकेल? नाही का? (हेही वाचा, Lock Upp कंटेस्टेंट Anjali Arora च्या स्विमिंग पूलमधल्या Bold फोटोंनी केला कहर, पहिल्यांचा केले इतके Sexy फोटो पोस्ट)

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Md Ishan Raza (@hashmi__charaag)

अंजली अरोडा स्पष्टीकरण देताना काकुळतीला येऊन म्हणते की, मला नाही माहिती हे लोक काय करत आहेत. माझे नाव आणि फोटो लावून हे लोक असले व्हिडिओ का व्हायरल करत आहेत. मला काहीच कळत नाही. लोकांनीच तर मला इतक्या उंचीवर (?) आणले आहे. तरीही लोक आता माझ्यासोबत असे का वागत आहेत. जशी लोकांना फॅमेली आहे तशीच मलाही आहे. माझी फॅमेलीपण हे व्हिडिओ पाहते. जेव्हा मी या सगळ्या गोष्टी पाहते तेव्हा मला कळत नाही लोक असे का करत आहेत. जो व्हिडोओ माझा म्हणून व्हायरल होतो आहे तो माझा नाही. तरीही लोक माझ्या नावे तो का पसरवत आहेत.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Md Ishan Raza (@hashmi__charaag)

आपल्या म्हणण्यावर जोर देत अंजली अरोडा म्हणते की, ठिक आहे, जर तुम्हाला कोणाला बदनामच करायचे असेल तर. कोणीतरी म्हटलेच आहे (कोणी ते माहिती नाही) जर कोणाची बरोबरी करता येत नसेल तर त्याला बदनाम केले जाते. दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार अंजली ही सध्या 21 वर्षांची आहे. तिच्या पालकांना वाटते की तिच्यासोबत होत असलेल्या घटनांना हाताळण्यासाठी ती तितकी प्रगल्भ नाही. पाठिमागे एकदा कोणत्या तरी प्रकरणात तिच्या पालकांनी एक एफआयआरही दाखल केली होती म्हणे.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Md Ishan Raza (@hashmi__charaag)

सगळ्यात शेवटी अंजलीने म्हटले आहे की, या व्हिडिओवरुन तिचा भाऊ, तिचा बॉयफ्रेंड आकाश आणि कुटुंबीयांनी सायबर पोलिसांकडे एक तक्रारही दाखल केली आहे.