
कलाकारांचं आयुष्य नेमकं कसं असता? असा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल ना? या प्रश्नाचं उत्तर द्यायला लवकरच येत आहे एक नवा आणि मराठमोळा टॉक शो ज्याचं नाव आहे 'दोन स्पेशल'.
Colors Marathi वाहिनी हा नवा टॉक शो प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या फेव्हरेट स्टार्सचा संघर्ष, त्यांची सुख - दु:ख, भावुक करणार्या गोष्टी, ते काय विचार करतात, त्यांचा इथवरचा प्रवास कसा होता, या मंडळी प्रसिद्धीच्या शिखरावर कसे बरे पोहचले, अशा अनेक गोष्टी.
या नव्या कोऱ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे आपल्या सर्वांचा लाडका व अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशी. 'दोन स्पेशल' च्या मंचावरून मालिका, रंगभूमी, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकारांसोबत जितु मनमुराद गप्पा मारणार आहे.


शोच्या पहिल्याच भागात सुबोध भावे आणि सुमित राघवन या दोन दिग्गज कलाकारांसोबत गप्पांची कडक मैफल रंगणार आहे. तर त्यानंतरच्या भागांमध्ये गुरु ठाकूर, किशोर कदम, बिग बॉस मराठी सीझन 2 पर्वातील काही मंडळी देखील या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.
हा शो 31 ऑक्टोबरपासून गुरुवार आणि शुक्रवार रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे.