Jasmin Bhasin च्या आईला रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी फिरावे लागले वणवण, नाराज अभिनेत्रीचे भावूक ट्विट
Jasmin Bhasin (Photo Credits: Instagram)

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवत आहे. या गोष्टीची झळ आता सेलिब्रिटींच्या कुटूंबाला देखील जाणवू लागली आहे. बिग बॉस 14 स्पर्धक जैस्मि भसीन (Jasmin Bhasin) हिच्या आईला रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यामुळे ती खूपच नाराज झाली असून आपल्या आईच्या काळजीने ती भावूक झाली आहे. तिने ट्विटद्वारे आपले मन मोकळे केले आहे.

"मी खूप नाराज आणि दु:खी आहे. प्रत्येक दिवशी मृत्यूची बातमी, ऑक्सिजन आणि बेडच्या शोधात लोक रस्त्यावर मरत आहेत. माझ्या आईला दोन दिवसांपूर्वी याच परिस्थितीतून जावे लागले. कारण बेड शोधणे हे तिच्यासाठी खूपच जोखमीचे काम होते. माझे वयोवृद्ध वडिल माझ्या आईला मेडिकल सुविधा मिळावी यासाठी संघर्ष करत होते. अनेक लोक या स्थितीतून जात आहेत."हेदेखील वाचा- Harshvardhan Rane चा दिलदारपणा! कोरोना काळात रुग्णांच्या मदतीसाठी अभिनेता विकत आहे आपली आवडती बाईक

जैस्मिन भसीनने आपल्या पुढील ट्विटमध्ये "लोक आपल्या जवळच्या व्यक्तींना, कुटूंबियांना गमावत आहे. आम्ही कोणाला दोष द्यावा? काय आपले प्रशासन हरले आहे का?" असे म्हटले आहे.

जैस्मिनच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आईच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच कमेंट्समधून जैस्मिनला काळजी घे असेही तिचे चाहते सांगत आहेत.

जैस्मिनच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे जाले तर, ती एली गोनी ला डेट करत आहे. ती अनेकदा एलीसोबत मिडियाद्वारे स्पॉट करण्यात आली आहे.