'सनम तेरी कसम' या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) यांनी कोरोना काळात आपला दिलदारपणा दाखवला आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने गरजूंना मदत करण्यासाठी हर्षवर्धनने आपली आवडती बाईक(Bike) विकत आहे. हर्षवर्धनने आज सोशल मिडियावर आपल्या बाईकचा फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. कोरोना काळात आपला देश या भयाण संकटापासून वाचविण्यासाठी अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. कोरोना काळात हवी ती मदत करत करण्याची तयारी दर्शवत आपल्या सोशल मिडियाची वापर करत आहे.
"ऑक्सिजन कंसन्ट्रेटर्ससाठी मी आपली बाईक देत आहे. ज्यामुळे गरजूंना मदत होईल. कृपया मला हैदराबादमध्ये उत्कृष्ट कंसन्ट्रेटर्स मिळवून देण्यासाठी मदत करा." अशी पोस्ट हर्षवर्धनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केली आहे.हेदेखील वाचा- Shahid Kapoor आणि पत्नी Mira Kapoor कोरोना काळात गरजूंना मदत करण्यासाठी सोशल मिडियाद्वारे केले आवाहन, स्वत: पासून केली सुरुवात
हर्षवर्धनप्रमाणे आज बॉलिवूड गायक सोनू निगम ने मुंबई शहरात ऑक्सिजन कंसन्ट्रेटर्स दान करण्याची घोषणा केली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्या कारणाने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. म्हणून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपापल्या परीने ऑक्सिजनची मदत करत आहेत. त्यातच हर्षवर्धन राणे आपली बाईक विकून ऑक्सिजनसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
हर्षवर्धन राणे याने 'सनम तेरी कसम', 'पलटन' आणि 'तैश' सारख्या चित्रपटांत काम केले आहे. मागील वर्षी त्याला कोरोनाची लागण झाली होती. जेव्हा तो आयसीयूमध्ये होता. ज्यानंतर त्याने तैशचे डबिंग केले होते.