सैराट या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आता सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या रियालिटी शो चं सुत्रसंचालन करताना दिसत आहेत. हा शो सध्या चांगला गाजत आहे. मात्र या शो साठी नागराज मंजुळे यांनी किती मानधन घेतले ठाऊक आहे? तर टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या शो साठी नागराज यांनी तब्बल 2 कोटी रुपये घेतले असून हा शो 45 एपिसोडचा असणार आहे.
टाईम्सच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी लोकांना करोडपती करण्यापूर्वीच नागराज करोडपती घेऊन हॉटसीटसमोर बसले आहेत. हिंदी रिअॅलिटी शोच्या तुलनेत ही किंमत कमी असली तरी रिअॅलिटी शो आणि त्यांच्या होस्टचे मानधन हा नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. विशेष म्हणजे 'कोण होणार करोडपती' या शो साठी नागराज यांनी रॅपसॉन्ग देखील गायले आहे.
नागराज मंजुळे यांचा 'झुंड' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन झळकणार असून हा सिनेमा फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्याचबरोबर या सिनेमातून रिंकू-आकाश ही सैराट जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यापूर्वी नागराज मंजुळे यांच्या 'नाळ' सिनेमाने प्रेक्षकांना भावनिक साद घातली होती.