नागराज मंजुळे,अमिताभ बच्चन (photo credits: Instagram)

सैराटच्या अभुतपूर्व यशानंतर आता दिग्दर्शक नागराज मंजुळे हिंदी सिनेमामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. नागराज मंजुळे 'झुंड' हा आगामी सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत

झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या मुलांना फूटबॉलचे धडे देणारा प्रशिक्षक अशी अमिताभ बच्चन यांची भूमिका आहे. ही कहाणी विजय बरसे यांच्या जीवनकथेवर आधारित आहे. मागील वर्षभरापासून या सिनेमाच्या शूटींगमध्ये अनेक अडथळे येत होते. अखेर आता 'झुंड' सिनेमा चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे.

 

नागपूरात होणार चित्रीकरण

'झुंड' या सिनेमाचं शूटींग नागपूरात होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग नागपूरात 80 हून अधिक दिवसांचं असणार आहे. अमिताभ बच्चन या सिनेमाच्या शूटिंगसाठी सलग 45 दिवस नागपूरात दाखल होणार आहे.'झुंड' सिनेमात नॉन प्रोफेनल अ‍ॅक्टर्स ( अभिनयाशी संबंध / प्रशिक्षण ) नसलेली लोकं कलाकार म्हणून दिसणार आहेत. त्यासाठी मुलांना खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे.