रिंकू-आकाश ही सैराट जोडी नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' सिनेमात पुन्हा एकत्र!
Rinku Rajguru-Aakash Thosar-Nagraj Manjule (Photo Credit : Facebook)

लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) लवकरच 'झुंड' (Jhund) सिनेमात घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नागराजच्या 'सैराट' सिनेमाने विक्रमी यश संपादन केले. त्यातील सैराट जोडी आर्ची-परशा म्हणजेच रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Aakash Thosar) या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आता ही जोडी पुन्हा एका नागराजच्या 'झुंड' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बीग बी अमिताभ बच्चन हे 'झुंड' सिनेमात असल्याने सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर येथील शूटिंग संपल्यानंतर बिग बी भावूक झाले होते. आता रिंकू आणि आकाशही सिनेमात असल्याने प्रेक्षकांची उत्कंठता अधिकच वाढली आहे. सैराट जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची प्रचंड इच्छा होती. Big B यांचा खूप दिवसानंतर गावातील बैलगाडीतून प्रवास, दिला जुन्या आठवणींना उजाळा

'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन फूटबॉल प्रशिक्षण विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. विजय बारसे हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉलचे प्रशिक्षण देत असतात. बीग बीं चा अभिनय आणि रिंकू-आकाश ही सैराट जोडी यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.