Big B यांचा खूप दिवसानंतर गावातील बैलगाडीतून प्रवास, दिला जुन्या आठवणींना उजाळा
अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य- फेसबुक)

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित सुपरहिट ठरलेला 'सैराट' (Sairat) चित्रपटानंतर आता आगामी चित्रपट 'झुंड' (Jhund) च्या शूटींगला सुरुवात झाली आहे. तर काही दिवसांपूर्वी झुंडची शूटींग नागपूरात करण्यात आले होते. या चित्रपटातून अमिताभ बच्चन झळकणार असून त्यांनी शूटींग बद्दलच्या गोष्टींच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तर अमिताभ यांनी आठवणीतल्या गोष्टी म्हणून काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

बिग बी झुंड या चित्रपटामुळे खूप उत्साही दिसून येत आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून या चित्रपटाच्या शूटींगचे फोटो समोर येत आहेत. तर खुद्द अमिताभ बच्चन यांनी गावातील बैलगाडीतील प्रवासाबद्दचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर फोटोच्याखाली त्यांनी खूप दिवसानंतर गावातील बैलगाडीचा आनंद घ्यायला मिळाला आहे. तसेच कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत पुढे असे म्हटले आहे की, मी जेव्हा बस किंवा ट्रामचा प्रवास महाविद्यालयात जाण्यासाठी करत असे.(हेही वाचा- दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच Sairat 2 प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार)

झुंड या चित्रपटातून अमिताभ बच्चन एका प्रशिक्षकाची भुमिका साकारणार आहे. तसेच फुटबॉल खेळावर आधारित या चित्रपटाची सत्य कथा दाखवण्यात येणार आहे.