दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच Sairat 2  प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार
दिग्दर्शक नागराज मंजुळे (फोटो सौजन्य- ट्विटर)

मराठी सिनेसृष्टीतील प्रेमसंबंधावर आधारित असेला सैराट (Sairat) हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 29 एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केले असून त्यातील गाणीसुद्धा प्रेक्षकांना फार आवडली होती. मात्र नागराज मंजुळे इतक्यावर थांबले नसून सैराटचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.

सैराट चित्रपाटील मुख्य भूमिकेतून झळकलेले सिनेकलाकार आर्ची आणि परशा हे या चित्रपटानंतर खूप प्रसिद्ध झाले. तर चित्रपटाची प्रेमकथा ही सरळ साध्या पद्धतीने दाखविण्यात आली होती. परंतु प्रेमाला कोणतेही बंधन नसते हे सिद्ध करत आयुष्यातील संकटावर समोरे जात कशा पद्धतीने आयुष्य जगाव हे या चित्रपटातून पहायला मिळाले. तर सैराट चित्रपटातील कलाकार रिंकु राजगुरु (आर्ची) हिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाने अनेक मराठी सिनेमांचे रेकॉर्ड ही मोडीत काढले आहेत.

एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार, सैराट2 या सिनेमाचे चित्रिकरण सध्या पुण्यात सुरु झाले असल्याचे सांगितले आहे. तर पुणे चित्रपट महामंडळात सैराट2 या शीर्षकाची पुष्टी करण्यात आली आहे.

असं असेल कथेचं स्वरुप

प्राथमिक स्वरुपात मिळालेल्या माहितीनुसार, आर्ची आणि परशा यांचा मुलगा मोठा झाल्यानंतर काय होणार या बद्दलची कथा असणार आहे. तर सुमन अक्का ही या सिक्वलमध्ये अनाथ मुलांचे पालनपोषण करतानाच्या भुमिकेत दिसणार आहे. तसेच मावशीची भुमिका ही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करणार आहे. मात्र सैराट चित्रपटाच्या शेवटापासून सैराट2 चित्रपटाची कथा सुरुवात होणार आहे. त्यामुळे सैराटच्या सिक्वलमध्ये परशाचा मुलगा प्रिंस म्हणजेच आर्चीचा भाऊ याचा बदला घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.