Thugs of Hindostan Song : अजय -अतुलच्या 'वाश्मल्ले' गाण्यावर आमिर खान आणि अमिताभ बच्चनचा बेभान डान्स (Video)
आमिर खान और अमिताभ बच्चन (Photo Credits: Youtube)

अमिताभ बच्चन आणि आमिर खान ही जोडी पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर रसिकांना एकत्र पहायला मिळणार आहे. त्यामुळे 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या आगामी सिनेमाबाबत त्यांच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या ट्रेलरनंतर या सिनेमाचं पहिलं गाणं रीलिज करण्यात आलं आहे. यशराजच्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याची झलक लोकांच्या भेटीला आली आहे.

वाश्मल्ले  गाणं रीलिज

 

वाश्मल्ले  या शब्दाचा अर्थ बेभान होऊन आनंदात नाचणं. त्यामुळे आमिर खान आणि अमिताभ बच्चन या गाण्यामध्ये एकत्र थिरकताना फारच कमालीचे दिसत आहे. वाश्मला हे गाणं सुखविंदर सिंग आणि विशाल ददलानीने गायलं आहे. मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर प्रभूदेवाने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

8 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' रीलिज होणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा साना शेख, कॅटरिना कैफ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.