Thugs Of Hindostan Trailer : बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज अमिताभ, आमिर यांचा 'हा' सिनेमा
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर (Photo Credits : Twitter)

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, आमिर खान या कलाकारांचा सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला होता. या दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाचा ट्रेलरही अतिशय जबरदस्त आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील आमिर खानच्या बहुप्रतिक्षित भूमिकेची पहिली झलक

यशराज फिल्म्सने दिवाळीची ही खास भेट रसिक प्रेक्षकांसाठी आणली आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच व्हायरल होत आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील कतरिना कैफचा घायाळ करणारा लूक !

पाहा सिनेमाचा हा जबरदस्त ट्रेलर...

या सिनेमात अमिताभ बच्चन खुदाबक्शचा भूमिकेत दिसतील. कतरिना कैफ सुरैय्या म्हणून समोर येईल तर फातिमा सना शेख सिनेमात जाफिरा असेल. या मल्टी स्टारर सिनेमात ब्रिटिश अभिनेते लॉयड आवन देखील आहेत. तर आमिर खान फिरंगी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ठ्ग्स ऑफ हिंदोस्तानमधील अमिताभ बच्चनचा धमाकेदार लूक भेटीला !

या सिनेमाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले असून हा सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.