Motion Poster : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील कतरिना कैफचा घायाळ करणारा लूक !
कतरिना कैफ (Photo Credits: Twitter)

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमातील कतरिना कैफचा लूक आज शेअर करण्यात आला. लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी कतरिना यात 'सुरैय्या' ही भूमिका साकारणार आहे. यशराज फिल्म्सने हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, "ती संपूर्ण हिंदुस्तानला गुडघ्यावर आणण्यास तयार आहे. कतरिना कैफ बनली सुरैय्या."

सुरैय्याची दिलखेचक अदा

मोशन पोस्टरद्वारे कतरिनाचा लूक शेअर करण्यात आला. यातील कतरिनाचा अतिशय बोल्ड, मादक अंदाज अनेकांना घायाळ करेल यात काही शंकाच नाही. मोशन पोस्टरमध्ये सुरुवातीला एक प्रेक्षकांनी भरलेले एक थिएटर दिसते. मग मोठा पडदा सरतो आणि कतरिना मुजरा करताना पाहायला मिळते.

यापूर्वी सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला आला होता. त्याचबरोबर बीग बींचा तडफदार लूक पाहायला मिळाला होता. पहा टीझर : उत्सुकता संपली; बिग बी, आमीरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा टीझर

या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये अमिताभ बच्चन, आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.