ठ्ग्स ऑफ हिंदोस्तानमधील अमिताभ बच्चनचा धमाकेदार लूक भेटीला !
खुदाबक्ष भूमिकेतील अमिताभ बच्चन (Photo Credit: Twitter)

अमिताभ बच्चनच्या आगामी चित्रपटातील म्हणजेच 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटातील खास लूक आज शेअर करण्यात आला आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अशी ओळख असलेले अमिताभ बच्चन ठ्ग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये खुदाबक्ष ही भूमिका साकारणार आहे.

तडफदार अवतार

खुदाबक्ष या भूमिकेचा टीझर सोशल मीडियात शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जहाजावर उभे असलेले बिग बी, त्यांच्या हातातील तलवार, तडफदार व्यक्तिमत्त्व या टीझरमधून चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. 24 तासांपूर्वी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा लोगो रीलिज करण्यात आला होता. त्यापाठोपाठ पहिल्यांदा बिग बींच्या भूमिकेचा टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे.

8 नोव्हेंबरला  रीलीज 

अतिमाभ बच्चन यांच्यासोबत ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये आमिर खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला म्हणजे दिवाळीच्या दिवसात रीलीज होणार आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी टशन, धूम 3 असे सिनेमे चाहत्यांचा भेटीला आले आहेत.