उत्सुकता संपली; बिग बी, आमीरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली
आमीर खान - ठग्स ऑफ हिंदुस्तान (photo credit-Samachar Nama)

भारतीय चित्रपटसृष्टीमधील दोन दिग्गज कलाकार आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी यशराजच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मार्फत मिळणार आहे. हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकताच यशराजकडून चित्रपटाचा लोगो प्रदर्शित करण्यात आला. यशराजने दिलेल्या माहितीप्रमाणे हा चित्रपट ऐन दिवाळीत ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट लार्जर दॅन लाइफ असावा यासाठी यशराज फिल्म्स प्रोडक्शनने कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.  या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. आजवर बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याच आऊटडोर चित्रीकरणाला इतका पैसा वापरण्यात आलेला नव्हता असे म्हटले जाते.