TOH Aamir Khan Look : 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील आमिर खानच्या बहुप्रतिक्षित भूमिकेची पहिली झलक
आमिर खान (Photo Credits : Twitter)

यशराज फिल्मच्या आगामी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटाचा प्रथम टीझर लोगो रसिकांच्या भेटीला आला होता. त्यापाठोपाठ कलाकारांच्या भूमिकांची ओळख करून दिली. अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ पाठोपाठ रसिकांच्या आमिर खानच्या लूकची प्रतिक्षा होती.

आमिर खानचा खास लूक

अभिनेता आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात 'फिरंगी' ही भूमिका साकारणार आहे. या भूमिकेचा खास लूक यशराजच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

 

यशराज पाठोपाठ आमिर खानने त्याचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावेळेस 'फिरंगी' बाबत सांगताना म्हणाला ,'और इ हैँ हम, फिरंगी मल्लाह. हम से ज्यादा नेक इन्सान इस धरती पे कहीं नहीं मिलेगा आपको. सच्चाई तो हमरा दूसरा नाम है, और भरोसा हमरा काम. दादी कसम !!!'

ठग्स ऑफ हिंदोस्तान

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट 'कंफेशंस ऑफ ए ठग' या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाला डिजिटल रूपातील आइमेक्स फॉर्मेट देण्यात आला आहे. या रूपात बनणारा 'धूम 3', 'बैंग बैंग', 'बाहुबली 2' , 'पद्मावत' नंतर पाचवा भारतीय सिनेमा आहे.   विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा सिनेमा दिवाळीत 8 नोव्हेंबरला रीलिज होणार आहे.