'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवे च्या घरी चिमकुलीचे आगमन, सोशल मिडियावर शेअर केला लेकीसोबतचा सुंदर फोटो, See Pic
Ankush Wadhave (Photo Credits: Instagram)

अवघ्या महाराष्ट्राला निखळ विनोदाने हसवणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) मधील एका विनोदी कलाकारांच्या घरी गोड बातमीने हाच आनंद द्विगुणित झाला आहे. या मालिकेत उंचीने कमी असणारा मात्र त्याच्या विनोदाचा दर्जा तितकाच उंचावणारा अभिनेता अंकुर वाढवे (Ankur Wadhave) याच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. अंकुर वाढवे याला कन्यारत्नाचा लाभ झाल्याने तो णि त्याचे संपूर्ण परिवार प्रचंड खुश आहे. त्याने आपल्या लेकीसोबतचा एक क्युट फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

अंकुरने आपल्या लेकीला हातात घेऊन आपल्या चिमुकल्या परीसह आणि पत्नीसह सेल्फी काढला आहे. हा फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.हेदेखील वाचा- Manasi Naik Grahmag Puja Vidhi: मानसी नाईकच्या घरी लग्नविधींना सुरूवात, अभिनेत्रीचा झाला गृहमुखाचा कार्यक्रम, See pics

"कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो" असं कॅप्शन देत त्याने त्याच्या चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे.

चला हवा येऊ द्या मालिकेत कधी लहान मुलाची, कधी शाळकरी मुलाची, तर कधी स्त्रीची भूमिका साकारून आपल्या नानाविध भूमिकांनी अंकुर आपल्या प्रेक्षकांना खळखळून हसवत आला आहे. त्याचा या कलागुणांमुळे त्याने मराठी विनोदाचा दर्जा देखील आणखी उंचावला आहे. लेटेस्टली मराठी कडून अंकुर चे अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!