Manasi Naik Grahmag Puja Vidhi: मानसी नाईकच्या घरी लग्नविधींना सुरूवात, अभिनेत्रीचा झाला गृहमुखाचा कार्यक्रम, See pics
Manasi Naik Grahmag Vidhi (Photo Credits: Instagram)

'बघतोय रिक्शावाला' या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला आपली भुरळ पाडणारी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik Wedding) च्या हात लवकरच पिवळे होणार आहे. येत्या 19 जानेवारीला ती आपला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) याच्यासोबत महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह करणार आहेत. मानसीला देखील लग्नाचे वेध लागले असून तिच्या घरी लग्नविधींना सुरुवात झाली आहे. काल (16 जानेवारी) ला तिच्या घरी ग्रहमाग पूजा ( Grahmag Puja Vidhi) विधी पार पडला. अगदी साधेपणाने कुटूंबासोबत हा विधी पार पडला. या लग्नविधीचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

या फोटोजमध्ये मानसी नाईकच्या घरी ब्राहमणांच्या समक्ष ग्रहमाग पूजा केली जात आहे. मानसी नाईक हिने देखील रॉयल ब्लू रंगाची साडी परिधान केली असून त्याला साजेशी अशी ज्वेलरी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

हे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मानसी नाईकचा होणारा नवरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. अलीकडे तिच्या मैत्रिणी दिपाली सय्यद आणि सीमा कदम यांनी तिच्यासाठी स्पिंनस्टर पार्टीचे आयोजन केले होते. हे फोटो देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते.हेदेखील वाचा- Manasi Naik Spinster Party: मानसी नाईक साठी तिच्या खास मैत्रिणी दिपाली सय्यद आणि सीमा कदम ने केले स्पिनस्टर पार्टीचे आयोजन, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

पुण्यात 19 जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच मेहेंदी आणि संगीत सोहळा 18 जानेवारीला होईल. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी 19 जानेवारीला होईल” अशी माहिती मानसीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

मानसी नाईक आणि तिचा होणारा नवरा प्रदीप खरेरा हा लग्नसोहळा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लग्नात या दोघांच्या घरचे आणि जवळचे मित्र उपस्थित असतील असेही सांगण्यात येत आहे.