ब्रिटीश टीव्ही स्टार आणि माजी रग्बी खेळाडू जेम्स हस्केल (James Haskell) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आजतक ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच एका टीव्ही शो मध्ये त्याने त्याच्या शालेय जीवनातील एक आठवण सांगून खळबळजनक खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्याने असे सांगितले की, तो 18 वर्षांचा असताना त्याने त्याच्या खास मित्राचा त्याच्या 17 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत शाळेत सेक्स करतानाचा व्हिडिओ त्यांच्या नकळत बनवला होता. जेम्स हस्केल ने I'm A Celebrity या शो मधून या गोष्टीचा खुलासा केला. हे ऐकून त्याच्या तमाम चाहत्यांना धक्काच बसला.
mirror.co.uk च्या वृत्तानुसार, जेम्स हस्केल ने शाळेत असताना असे कृत्य केले होते. जेव्हा त्याने त्याचाच खास मित्र हा शाळेमध्येच गुप्तपणे आपल्या 17 वर्षांच्या गर्लफ्रेंड सोबत सेक्स करत होता त्यावेळी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. आपला कोणीतरी गुप्तपणे व्हिडिओ काढत आहे याची त्या मुलीला कल्पना देखील नव्हती.
हेदेखील वाचा- बॉलिवूड कपल रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकाने केला 'हा' मोठा खुलासा
इतकेच नव्हे तर जेम्स ने तो व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील दाखवला होता. जेव्हा ही गोष्ट त्या मुलीला कळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 2003 मध्ये झालेल्या या घटनेनंतर जेम्स, त्याचा मित्र, ती मुलगी या तिघांनाही शाळेने निलंबित केले होते.
मुलीला जेव्हा त्या सेक्स टेपची खबर लागली तेव्हा तिने स्वत:च ती टेप नष्ट केली. या घटनेने जेम्स आयुष्यातही अनेक वादळे आली होती. या सर्वांचा उल्लेख त्याने 'I'm A Celebrity' या कार्यक्रमात केला आहे.