Bigg Boss Season 13: बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच स्पर्धकांना मिळणार महिलेच्या आवाजातून आदेश?
Bigg Boss (Photo Credits-Twitter)

यंदा बिग बॉस 13 (Bigg Boss 13)  चे पर्व अधिकच खास असणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच प्रेक्षकांना या रिअॅलिटी शो मध्ये काही गोष्टी बदललेल्या दिसून येणार आहेत. शोसाठी थीम आणि कॉनेप्टसुद्धा मनोरंजनात्मक बनवण्यासाठी निर्माते तगडी मेहनत करत आहेत. मात्र बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच स्पर्धकांना महिलेच्या आवाजातून बिग बॉसचे आदेश मिळणार असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुळ बिग बॉसच्या आवाजातील अतुल कपूर यांच्यासह एक महिला सुद्धा आता असणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात महिला आणि पुरुषाच्या आवाजातील आदेश ऐकू येणार आहेत. काही रिपोर्ट्सनुसार असे बोलले जात आहे की, फिमेल बिग बॉस स्पर्धकांना सूचना देणार आहे. मात्र अद्याप यावर कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दुसऱ्या बाजूला सलमान खान याच्यासह एक महिलासुद्धा सुत्रसंचालन करताना दिसून येणार असल्याचे ही म्हटले जात आहे. गेल्या वर्षात ही सलमानसह कतरिना कैफ बिग बॉसच्या शोसाठी सूत्रसंचालन करण्याचे बोलले जात होते. मात्र ती चर्चा फक्त अफवाच ठरली.(BIGG BOSS 13 : बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी Salman Khan किती पैसे घेणार? रक्कम घ्या जाणून)

तर बिग बॉसच्या फॅनक्लबरवर दररोज एक नवीन अपडेट येत आहे. त्यामुळे शो संबंधित आधीच लीक करण्यात आलेल्या काही गोष्टी कितपत खऱ्या ठरणार हे पाहणे उत्सुकाचे असणार आहे. येत्या 29 सप्टेंबर पासून बिग बॉस सुरु होण्याची चर्चा तर सुरुच आहे. मात्र या शोच्या ग्रॅन्ड प्रिमिअरवेळी राखी सावंत तिचे नवे गाणे छप्पन छुरीवर थिरकताना दिसून येणार आहे.