बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आज करण जोहर शो चा विजेता घोषित करेल त्यानंतर प्रेक्षकांची ताणलेली उत्सुकता संपेल. बिग बॉसच्या घरात आता केवळ 5 सदस्य उरले आहेत. शमिता शेट्टी (Shamita Shetty), राकेश बापट (Rakesh Bapat), निशांत भट्ट (Nishant Bhatt), प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) आणि दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) अशी या स्पर्धकांची नावे आहेत. आज त्या 5 पैकी एकाच्या नावे ट्रॉफी होईल. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिग बॉसचा शो होस्ट करत आहेत. परंतु, निर्मात्यांनी यंदा बिग बॉस 15 पूर्वी बिग बॉस ओटीटी सादर करण्याचा प्लॅन केला. या शो चे होस्टिंग करण जोहर करत होता. केवळ 6 आठवड्यांच्या या शो चा अंतिम निर्णय आज होणार आहे. त्यामुळे नेमकं कोण विजेता ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वोटिंग ट्रेंड रिपोर्टनुसार, निशांत आणि दिव्या यांच्यात चांगलीच टक्कर पाहायाला मिळत आहे. तर प्रतिक, शमिता आणि राकेश पिछाडीवर आहेत. सोशल मीडियावर मात्र चाहते आपल्या फेव्हरेट स्पर्धकासाठी मतं मागत आहेत. (Bigg Boss 15: सलमान खान च्या बिग बॉस शो मधील नवं घर कसं आहे? पहा Photo)
View this post on Instagram
आता या पाचजणांपैकी कोण बाजी मारणार? याचा निर्णय आज रात्री होणार आहे. दरम्यान, या शो मधील टॉप 3 स्पर्धक थेट बिग बॉस 15 मध्ये एन्ट्री घेतील. हा शो संपताच सलमान खान बिग बॉस 15 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता मात्र आता शिगेला पोहचली आहे.