Apurva Nemlekar Brother Passed Away: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) वर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन झाले आहे. ओमकार नेमळेकर (Omkar Nemlekar) असं अभिनेत्रीच्या भावाचां नाव आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ओमकारचे निधन झाल्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. अपूर्वाने आपल्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भात दु:खद भावना शेअर केल्या आहेत. अपूर्वाच्या या पोस्टनंतर अनेक मराठी कलाकारांनी अभिनेत्रीच्या भावाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या भावाबरोबरचे काही फोटोजही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अपूर्वाने म्हटलं आहे की, 'माझा प्रिय भाऊ ओमी, आयुष्यात कधी कधी नुकसान होते. जे खरोखर कधीही बदलले जाऊ शकत नाहीत. तुला गमावणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. मी निरोप घ्यायला तयार नाही. मी तुला सोडायला तयार नव्हते. पण मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे. कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीही मरत नाही. काही बंध तोडता येत नाहीत. कारण, जरी तु येथे शारीरिकदृष्ट्या नसला तरी तुझं हृदय आहे - ते माझ्या आतच राहिलं. मी तुझे हृदय नेहमी माझ्यासोबत ठेवीन. (हेही वाचा - Uttara Bawkar passed away: जेष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे दीर्घ आजारानं पुण्यात निधन)
कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही. पण त्या दिवसापर्यंत, तू अजूनही माझ्यासोबत आहेस हे जाणून मला आराम मिळेल. तुझे हृदय माझ्या आत सुरक्षितपणे अडकले आहे. त्यामुळे काहीही बदलणार नाही. तेव्हा मी तुझ्यावर प्रेम केले. मी आताही तुझ्यावर प्रेम करत राहिल. तू माझ्या मनात, हृदयात कायमच असशील. माझ्या लहान भावा, आपण लवकरच भेटू. Rest in peace.'
View this post on Instagram
अपूर्वाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी अभिनेत्रीला भावाच्या मृत्यूचं कारण विचारलं आहे. यावर अभिनेत्रीने उत्तर देत त्याला हृदयरोगाचा झटका आला आणि यातचं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.