Bigg Boss Marathi 2, Third Week Elimination: विद्याधर जोशी उर्फ बाप्पा बिग बॉस मराठी 2 च्या घरातून बाहेर
Vidyadhar Joshi (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2  Episode 29: कालपासून सुरु झालेला WeekEnd चा डाव आजही बिग बॉसच्या घरात रंगला. कालच्या भागात महेश सरांनी सर्वच स्पर्धकांना त्यांच्या चुकांबद्दल जाब विचारत खडे बोल सुनावले. तर आजचा एपिसोड मात्र तुलनेत हलका-फुलका होता. सुरुवातीला स्पर्धकांमध्ये काहीसे वाद, मतभेद झाले. त्यानंतर चुगली रॉऊंडने गंमत आणली. म्हणींचा राऊंडही धम्माल उडवून देतो. (महेश सरांनी घेतली स्पर्धकांची शाळा; वीणा सुरक्षित तर पराग Danger Zone मध्ये)

मग स्पर्धकांना साजेशी अशी गाणी वाजवण्यात आली. ज्या स्पर्धकाला ते गाणं साजेस आहे त्याने ते ओळखून त्या स्पर्धकाने एका पार्टनरसोबत डान्स करायचा. या राऊंडने तर धम्माल उडवून दिली. आणि मग याच हॅप्पी नोटवर यंदाच्या आठवड्याच्या Elimination कडे सर्व महेश सर वळले. यापूर्वीच शिव सुरक्षित असल्याचे महेशसरांना जाहीर केल्यामुळे आता उरले होते फक्त तीन स्पर्धक. विद्याधर जोशी, सुरेखाताई पुणेकर आणि पराग कान्हेरे. या तिघांपैकी सुरेखाताई पुणेकर सुरक्षित असल्याचे महेश मांजरेकरांनी जाहीर केले. तर विद्याधर जोशी, पराग कान्हेरे आता Danger Zone मध्ये होते. त्यापैकी पराग सुरक्षित असल्याचे कळताच रुपाली त्याला मिठी मारते. तर बाप्पा जोशी यंदाच्या आठवड्यात घराबाहेर पडले.

बिग बॉस मराठी 2 ट्विट:

बाप्पांच्या जाण्याने घरातील सदस्य विशेषतः सुरेखाताई, वैशाली, नेहा, अभिजित केळकर फारच हळहळतात.