Bigg Boss Marathi 2 Day 28 Episode: बिग बॉसच्या घरात आज Weekend चा डाव रंगला. प्रत्येक आठवड्याप्रमाणे यंदाही महेश सरांनी बिग बॉस स्पर्धकांची शाळा घेतली. शाळेच्या सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच बिचुकले यांच्यावर कायदेशीर खटला चालू होता आणि त्यामुळे त्यांना अटक झाली. त्यांचं काय होईल ते होईल पण 'शो मस्ट गो ऑन' असं म्हणत महेश सरांनी शाळेला सुरुवात केली. चांगलं खेळणाऱ्यांचं कौतुक झालं. तर चुकीच्या गोष्टींबाबत स्पर्धकांची कानउघडणीही झाली. स्पर्धकांनीही आपली चूक मान्य करत माफी मागितली. तर काही वेळेस आपली बाजूही मांडली.
महेश सरांनी शाळेच्या सुरुवातीलाच या आठवड्यात चांगलं खेळणाऱ्या सदस्याला मध्यभागी बसण्यास सांगितले. हा मान नेहाला मिळाला. महेश सरांनी शिवला 'वळू' हे नवे नाव दिले. तर नेहासोबत कॅप्टनसी उमेदवार पदासाठी झालेल्या झटापटीमुळे त्याची चांगलीच कानउघडणीही केली. त्याचबरोबर महिलांसह इतर सदस्य त्यावेळी नेहाच्या बाजूने का बोलले नाहीत? असा सवालही उपस्थित केला. आजच्या Weekend च्या डावात स्पर्धकांवर भलतेच चिडले महेश मांजरेकर; पहा काय म्हणाले (Watch Video)
रुपाली आणि बिचुकले यांच्यात झालेल्या वादावरही महेश सरांनी प्रकाश टाकला. तसंच घरातील सर्वच सदस्य बिचुकलेला घाबरुन असतात आणि त्याच्या समोर बोलायची कोणाचीही टाप लागत नाही, असा थेट आरोपही केला.
विशेष म्हणजे धोबीपछाड कार्यात टीम B विजेती झाली नसून त्यांनी निव्वळ दादागिरी केली आणि संचालिका वैशाली माडे अत्यंत पार्शल असल्याचे मांजरेकर यावेळी म्हणाले.
पराग, अभिजित केळकर यांची तर सरांनी चांगलीच शाळा घेतली. सुरेखा ताई, वैशाली, बाप्पा शांत का राहतात? वेळोवेळी खंभीर भूमिका का घेत नाहीत? असे प्रश्नही मांजरेकरांनी उपस्थित केले. हिनाच्या एन्ट्रीने सर्वांना असुरक्षित वाटू लागलं, असं ही ते म्हणाले. पण ती ही इथे तुमच्याप्रमाणेच गेम खेळायला आली आहे, याची आठवणही त्यांनी करुन दिली.
एकंदर का सर्वांचे धागेदोरे महेश सरांना ठाऊक आहेत आणि ते वेळोवेळी कोणाला कोणत्या विषयावर टोकायचं, हे जाणतात.
यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्यांपैकी बिचुकले तर अटकेमुळे आधीच घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे राहिलेल्या स्पर्धकांपैकी आज पराग आणि वीणा यांच्यात वीणा सुरक्षित असल्याचे महेश सरांनी जाहीर केले. तर पराग सध्या Danger Zone मध्ये आहे. मात्र उद्याच्या दिवशी नेमकं काय होणार? कोणाची विकेट निघणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.