Bigg Boss Marathi 2, Episode 28 Preview: आजच्या Weekend च्या डावात स्पर्धकांवर भलतेच चिडले महेश मांजरेकर; पहा काय म्हणाले (Watch Video)
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसच्या घरात आज Weekend चा डाव रंगणार आहे. या आठवड्याभरात झालेले वाद, आरोप, प्रत्यारोप, मतभेद, चांगल्या गोष्टी या सगळ्यांची होस्ट महेश मांजरेकर उजळणी घेतील. इतकंच नाही तर स्पर्धकांच्या चुका कडक शब्दात लक्षात आणून देतील. दर आठवड्याला होणाऱ्या या Weekend च्या डावात महेश मांजरेकर प्रत्येक स्पर्धकाला आपल्या चुकांबद्दल ताकीद देत असतात. आज मात्र मांजरेकर भलतेच चिडलेले दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात महिलांसाठी वापरले जाणारे अपशब्द त्यांना खटकले आणि त्यांनी स्पर्धकांना खडेबोल सुनावले. "मी शो चा होस्ट असून मला याची लाज आणू नका," असेही ते म्हणाले. तसंच प्रीव्ह्यूमध्ये काही स्पर्धक आपल्याला रडताना दिसत आहेत.

पहा व्हिडिओज:

 

महेश सरांचा राग विशेषकरुन शिववर निघाला. या आठवड्यात शिवने नेमके असे काय केले की त्याला मांजरेकरांच्या रागाला सामोरे जावे लागले. (अभिजित बिचुकले यांना न्यायालयीन कोठडी; Bigg Boss मधील 'घरवापसी' बद्दल साशंकता कायम)

यंदाच्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये रुपाली आणि बिचुकलेंमध्ये जो वाद झाला त्यात बिचुकलेंनी रुपालीसाठी अत्यंत वाईट शब्द वापरले. बहुदा यावरुन महेश सरांनी सर्व सदस्यांची कानउघडणी केलेली दिसत आहे. यापूर्वी देखील बिचुकले यांच्या अशाप्रकारच्या वागण्यावर होस्ट महेश मांजरेकरांनी आपेक्ष घेत त्यांना ताकीद दिली होती.

अभिजित बिचुकले यांच्या अटकेनंतर घरातून एक सदस्य तर बाहेर पडला आहे. तर नॉमिनेट झालेल्या इतर स्पर्धकांपैकी या आठवड्यात कोण बाहेर जाणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.