अभिजित बिचुकले यांना न्यायालयीन कोठडी; Bigg Boss मधील 'घरवापसी' बद्दल साशंकता कायम
अभिजित बिचुकले यांना चेक बाउन्स (Check bounce)आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात चेक बाऊन्स प्रकरणात अभिजित बिचुकले यांना जामीन मिळाला. मात्र, खंडणी प्रकरणात त्यांना जामीन मिळू शकला नाही. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अभिजित बिचुकले आता न्यायालयात आपली बाजू सोमवारी मांडणार आहेत.
Bigg Boss Marathi Season 2 मधील वादग्रस्त आणि चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची रवानगी आता थेट न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody ) करण्यात आली आहे. अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी बिग बॉस सिझन 2 च्या गोरेगाव येथील सेटवरुन अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, अभिजित बिचुकले यांना चेक बाउन्स (Check bounce)आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात चेक बाऊन्स प्रकरणात अभिजित बिचुकले यांना जामीन मिळाला. मात्र, खंडणी प्रकरणात त्यांना जामीन मिळू शकला नाही. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अभिजित बिचुकले आता न्यायालयात आपली बाजू सोमवारी मांडणार आहेत.
दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर अभिजित बिचुकले यांच्या छातीत दुखू लागले होते. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बिचुकले यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi स्पर्धक अभिजित बिचुकले यांची अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया म्हणाले 'माझी अटक म्हणजे ..!')
दरम्यान, 'पोलिसांनी आपल्याला केलेली अटक हे राजकीय कटकारस्थान' असल्याचे अभिजित बिचुकले यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले अभिजित बिचुकले?
'माझ्या विरोधात तक्रार केलल्या संदीप संकपाळ यांच्या घरात गेली 12 वर्षे मी माझ्या कुटुंबासोबत राहतो. भाडे म्हणून ठरलेली रक्कमही आम्ही त्यांना देतो. त्याच्या कुटुंबाचे आणि आमचे कौटुंबिक संबंधही चांगले आहेत. असे असताना त्यांनी इतके जुने प्रकरण का उकरुन काढले हे मला समजू शकले नाही. माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार करणे म्हणजे हे एक राजकीय कटकारस्थानच आहे. माझ्याविरोधात तक्रार करण्यासाठी संदीप संकपाळ यांना भडकवण्यात आले आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठीच हा प्रकार करण्यात आला आहे', असा आरोप अभिजित बिचुकले यांनी केला आहे.
अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचा बिग बॉसच्या घरातील पुढील प्रवास कसा असेल याबाबत संधिग्दता आहे. कलर्स वाहिनीनेही अभिजित बिचुकले यांच्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही. त्यामुळे बिग बॉस, अभिजित बिचुकले आणि पोलिस प्रकरण यांच्याबातब अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2019 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

