Bigg Boss Marathi 2: माधव देवचक्के यालाच करा बिग बॉसचा विजेता, राखी सावंत हिचे चाहत्यांना वोट अपील  (Watch Video)
Rakhi Sawant Supports Madhav Deochake (Photo Credits: Instagram,TW)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात शिवानी सुर्वेच्या (Shivani Surve) पुनरागमनानंतर शो मध्ये पुन्हा रंगत वाढू लागली आहे, प्रत्येक स्पर्धक हा सर्व पद्धती वापरून घरात आपला टिकाव कसा लागेल याकडे लक्ष देऊन आहे. यामध्ये अनेकदा त्यांचे आपापसात खटके उडत असले तरी प्रेक्षकांना हे वाद बघायला आवडत आहेत. सामान्य नागरिकांसोबतच यंदा सेलिब्रिटींमध्ये सुद्धा या पर्वाची चर्चा सुरु आहे. घरातील सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी यातील काही जण सोशल मीडियावरून पुढे येत आहेत. अलीकडेच ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सुद्धा असाच एक व्हिडीओ बनवून आपल्या इन्स्टावरून पोस्ट केला होता, यात तिने घरातील सर्वच सदस्यांचे कौतुक केले आहे पण त्यातही विशेषतः माधव देवचक्के (Madhav Deochake) याचे नाव घेत तिने आपल्या चाहत्यांना माधवला भरघोस मत देण्यास सांगितले आहे.

राखीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, तिने ‘माधव खुप चांगला माणुस आणि कलाकारही आहे. त्यामुळे त्याला भरघोस मत द्या आणि विजयी करा. माधव तू बिग बॉसच्या घरातून नॉमिनेट व्हायचे नाही. तू जिंकुनच बाहेर ये. माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा’ असे म्हंटले आहे. झोप उडवणारा फोटो टाकून राखी सावंत म्हणते 'Good Night, Sweet Dreams'

पाहा काय म्हणतेय राखी सावंत...

हे ही वाचा -Bigg Boss Marathi 2: खुशखबर! पराग कान्हेरे ची बिग बॉस मध्ये होणार एन्ट्री? स्वतः पोस्ट लिहून दिली माहिती, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

माधव हा सध्या नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांच्यासोबत ग्रुप बनवून बिग बॉसच्या घरात खेळताना पाहायला मिळत आहे, वास्तिवकता त्याचा खेळ लोकांना आवडत असला तरी अनेकदा त्याची विनाकारण आवाज चढवून बोलण्याची पद्धत खटकते, तसेच महेश मांजरेकर यांनी सुद्धा त्याच्या गडबडीत बोलण्यावर अनेकदा शाळा घेतली आहे. अशात राखी सावंतने माधवची पाठराखण करून आपल्या चाहत्यांना केलेल्या आवाहनामुळे माधवला कितपत फायदा होतोय हे बघणे रंजक ठरणार आहे.