Bigg Boss Marathi 2: खुशखबर! पराग कान्हेरे ची बिग बॉस मध्ये होणार एन्ट्री? स्वतः पोस्ट लिहून दिली माहिती, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

आता पुन्हा एकदा सर्वांची हवा टाईट करायला परागची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. परागने स्वतः याबाबत फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Bigg Boss Marathi 2: खुशखबर! पराग कान्हेरे ची बिग बॉस मध्ये होणार एन्ट्री? स्वतः पोस्ट लिहून दिली माहिती, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
arag Kanhere To Re Enter In Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Instagram)

सध्या बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व (Bigg Boss Marathi 2) इंटरेस्टिंग वळणावर पोहचले आहे. घराबाहेर गेलेली शिवानी सुर्वे (Shivani Surve) परत आल्यावर रोजच भांड्याला भांडे लागत आहे. या सर्वांमध्ये चाहते मिस करत आहेत पराग कान्हेरे (Parag Kanhere) याला. अतिशय उत्तम खेळणारा पराग त्याच्या कर्माने अचानक घराबाहेर पडला होता. घरातील सदस्यांना कदाचित या गोष्टींचा आनंद झालाही असेल मात्र प्रेक्षकांनी हळहळ व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा सर्वांची हवा टाईट करायला परागची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. परागने स्वतः याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

परागची पोस्ट –

येतोय मी... आता सगळ्यांचा हिशोब होणार, तू तो आणि ती पण जाणार अशी पोस्ट परागने पोस्ट केली असून, यावरून पराग पुन्हा बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पराग वाईल्ड कार्ड एन्ट्री असेल का पाहुणा म्हणून येईल हे लवकरच कळेल. नेहा शितोळे सोबतच्या गैरवर्तनामुळे परागला बाहेर जावे लागले होते. त्यावेळी कदाचित घरातील सदस्यांनी पराग माफ केले असते तर पराग बाहेर गेलाच नसता. मात्र आता या पोस्टमुळे पराग पुन्हा परत येण्याची आशा निर्माण झाली आहे.

पराग, वीणा, नेहा, अभिजित बिचुकले आणि शिवानी हे विजेत्यापदाचे दावेदार मानले जात होते. त्यात शिवानी, अभिजित आणि पराग विविध कारणांनी बाहेर पडले होते. शिवानी जेव्हा पुन्हा एकदा शो मध्ये आली तेव्हा परागने एक पोस्ट लिहून हा निर्णय आपल्याला आवडला नसल्याचे सांगितले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2019 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).