झोप उडवणारा फोटो टाकून राखी सावंत म्हणते 'Good Night, Sweet Dreams'
Rakhi Sawant (Photo Credits: Instagram)

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच आपल्या काही ना काही अतरंगी गोष्टींमुळे, वक्तव्यामुळे चर्चेत असते. तिचा बिनधास्तपणा, हटके अदाच तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. अशी ही बिनधास्त, बेधडक राखी सावंत सोशल मिडियावर देखील तितकीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ती नेहमी सोशल अकाउंटवर काही ना काही शेअर करत असते. मग ते टिकटॉक व्हिडिओ असो, तिचे फोटोशूट असो किंवा शूटिंग सेटवरची धमाल असो. तिने नुकताच आपला एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिची स्तुती देखील केली आहे तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

विशेष म्हणजे या फोटोत ती खूपच भयानक दिसत असून तो फोटो पाहिला तर काहींना भीती देखील वाटेल. मात्र असे असताना ही तिने चक्क ह्या फोटो खाली 'गुड नाईट, स्वीट ड्रीम्स' असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

Fainaly good night sweet dreams

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

View this post on Instagram

 

Good night 💤 💤

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखी नेहमी तिच्या बिनधास्त अदा आणि बोलण्यामुळे चर्चेत असते. राखी सावंत खरी ओळख मिळाली ती 'परदेसियां' या गाण्यामुळे. या गाण्याने अख्खे आयुष्यच बदलून गेले. मग बिग बॉस, राखी का स्वयंवर यांसारख्या अनेक रिअॅलिटी शो मधून ती झळकली.