Bigg Boss Marathi 2: 'पराग कान्हेरे' याची 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा एंट्री? घरातील सदस्यांना मिळणार आश्चर्याचा धक्का
Parag Kanhere To Re Enter In Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वातील बहुचर्चित खेळाडू सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे (Parga Kanhere)  याला घरात हिंसा केल्यामुळे काल एकाएकी घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. आपल्या खेळीमुळे तो जितका ओळखला गेला तितकाच त्याने घरातील सदस्य नेहा शितोळे (Neha Shitole) सोबत केलेल्या गैरवर्तणुकीमुळे तो टीकेचा विषय बनला होता. या आठवड्यातील 'टिकेल तो टिकेल' या टास्क दरम्यान त्याने नेहाच्या कानाखाली लगावली होती, यावरून मागील दोन दिवसांपासून शो मध्ये बराच वाद रंगला होता, काल परागच्या या वागणुकीचा निषेध करत बिग बॉस ने त्याला घराबाहेर पडायला सांगितले. पण आता टाइम्सच्या सूत्रानुसार परागला आपण कदाचित याच 'विकेंड च्या वार'  रचला घरामध्ये पुन्हा पाहू शकणार आहात. मात्र तो थेट घरात एंट्री घेणार की त्याला एखाद्या सिक्रेट रूम मध्ये ठेवण्यात येईल याविषयी शो च्या टीमने अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.

टिकेल तो टिकेल या टास्क दरम्यान एका स्पर्धकाला हातात शिल्ड घेऊन खुर्चीवर बसायचे होते, आणि समोरच्या टीममधील प्रतिस्पर्ध्यांना त्याला आपल्या जागेवरून उठण्यास प्रवृत्त करायचे होते. या खेळादरम्यान नेहा आणि वैशालीने आपल्या बळाचा वापर करून परागला खुर्चीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर आपला संयम सोडून परागने चक्क नेहाच्या कानशिलातच भडकावली. बिग बॉसच्या घरात हिंसा करणे हे नियमांचे उल्लंघन असल्याने या कृत्यावरून परागवर बरीच टीका झाली होती. मात्र काल त्याला घरातून बाहेर काढले असले तरी अजून त्याला सेटवरून बाहेर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे आज, शनिवारी त्याला पुन्हा घरात एंट्री दिली जाणार अशा चर्चा रंगत आहेत.

मागील पर्वात सुद्धा राजेश शृंगारपुरे याला अशाच प्रकारे हिंसा केल्यामुळे घरातून बाहेर काढून एका सिक्रेट रूम मध्ये ठेवण्यात आले होते त्यामुळे परागच्या बाबतही असेच काही घडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, यासोबतच महेश मांजरेकर आजच्या वीकेंडच्या वार मध्ये परागच्या समर्थक टीम सोबतच नेहा आणि वैशालीला टास्क दरम्यान बळाचा वापर करण्यावरून काही बोलणार का याकडे सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.