Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात होणार शिवानी सुर्वे ची एन्ट्री?; फ्लॉप होत असलेल्या सीझनमध्ये नवीन ड्रामा
Shivani Surve ( Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठीच्या 2 ऱ्या सीझनने (Bigg Boss Marathi) प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे. सोशल मिडीयावर चाललेल्या चर्चेच्या आधारे बोलायचे झाले तर, सध्याचा सीझन पूर्णतः फ्लॉप झाला आहे. आता कसे तरी तग धरून ठेवण्यासाठी निर्मात्यांनी नवनवीन युक्त्या वापरण्याचा चंग बांधला आहे. यासाठीच आता बिग बॉसच्या घरातून सीन क्रिएट करून बाहेर पडलेली शिवानी सुर्वे (Shivani Surve) हिची पुन्हा शोमध्ये एन्ट्री होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे 

बिग बॉस मराठीच्या या वर्षीच्या सीझनने पहिल्याच आठवड्यात भांडणे पहिली, त्यात शिवानी सुर्वे, अभिजित बिचुकले आणि पराग यांसारखे तगडे सदस्य विविध कारणांमुळे घराबाहेर गेल्याने, मागे गड लढवायला तसे कोणीच शिल्लक नव्हते. त्यामुळे शिवानीला पुन्हा एकदा घरात घेण्याचा बिग बॉसचा विचार आहे. येत्या वीकएंडचा डाव मध्ये तिची एन्ट्री होणार आहे. शिवानीच्या एन्ट्रीने घरात पुन्हा एकदा मोठा ड्रामा होण्याची शक्य आहे, ज्यातून निर्मात्यांचा फायदा  होईल. (हेही वाचा: शिवानी सुर्वे चा 'बिग बॉस'चे नियम धाब्यावर बसवत घराबाहेर पडण्याचा हट्ट)

बिग बॉसच्या घरात शिवानी मानसिकदृष्ट्या प्रचंड खचली होता. याच कारणाने बिग बॉसशी भांडून ती घरातून बाहेर पडली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी पुन्हा एकदा तिला घरात येण्याची विनंती केली, ज्याला तिने होकार दिला आहे. शिवानी घरात पाहुणी म्हणून येणार आहे का प्रतिस्पर्धी म्हणून याबाबत अजूनतरी कोणताही खुलासा झाला नाही. दरम्यान, संपूर्ण बिग बॉस च्या इतिहासात डॉली बिंद्रा  (Dolly Bindra) नंतर शिवानी अशी स्पर्धक आहे जिला पुन्हा एकदा बिगच्या घरात प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे.