Bigg Boss Marathi 2, Episode 92 Preview: बिग बॉस मराठी 2 ची अंतिम फेरी गाठणारे स्पर्धक आज ठरणार
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

Weekend Cha Daav, 25  August:  बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi)  च्या घरात आज शेवटचा विकेंडचा डाव रंगणार आहे. आता शेवटच्या आठवड्याच्या प्रवासामध्ये बिग बॉसच्या घरात नेमके कोणकोणते सदस्य राहणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यंदाच्या आठवड्यात शिव, वीणा, किशोरी आणि आरोही हे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तर नेहा आणि शिवानीला तिकीट टू फिनाले मिळालं आहे. यंदा अंतिम फेरी कोण गाठणार ही उत्सुकता बिग बॉसच्या प्रेक्षकांना लागली आहे. आज शेवटच्या विकेंडच्या डावमध्ये (Weekend Cha Daav)  त्याचा उलगडा होणार आहे.

बिग बॉस मराठी 2 च्या अंतिम फेरीत पोहचणार्‍या स्पर्धकांच्या यादीसोबतच घरात पाहुणे म्हणून असलेले अभिजित बिचुकले देखील घरात राहणार का? घराबाहेर पडणार हे पाहण्याची उत्सुकता आहे. यंदाच्या सीझनच्या सुरूवातीपासूनच अभिजीत बिचुकले यांच्या वादग्रस्त तसेच अघळपघळ बोलण्यावरून चर्चेत आले होते. आजच्या विकेंडच्या डावमध्येही आरोपी ठरवण्याच्या टास्क दरम्यान भेटायला आलेल्या सदस्यासमोरही ते मुद्दा सोडून बोलताना पाहून होस्ट महेश मांजरेकरांनी त्यांची फिरकी घेतली. बिग बॉस मराठी 2 च्या घरात काय घडणार? 

आज अभिजित बिचुकले आणि शिवानी 'तोफा, तोफा... ' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. Bigg Boss Marathi 2, August 24, Episode 91 Update: वीणाचे घरातील वागणे पाहून आरोहने व्यक्त केला रोष, महेश मांजरेकर यांनी फिनालीमध्ये पोहचल्याने दिल्या शिवानी आणि नेहाला शुभेच्छा

घरात सुरक्षित होणार्‍या सदस्यांची घरातील नावाची पाटी सोनेरी रंगांची होणार आहे. प्रत्येकाला नवी प्लेट मिळणार आहे. त्यामुळे ज्याच्याकडे सोनेरी पाटी नसेल तो घराबाहेर पडेल... मग पहा कोण असेल तो सदस्य ज्याचा यंदाच्या सीझनच्या एक आठवडाआधी घरातील प्रवास संपणार आहे.